महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मास्क न वापरणाऱ्या 6 हजारांहून अधिक मुंबईकरांवर पोलिसांची कारवाई - mumbai police news

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 6 हजार 200 जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

file photo
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 31, 2020, 9:23 PM IST

मुंबई- कोरोनाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केले जात आहेत. कोरोनाचे व्हायरसचे संक्रमण वाढू नये म्हणून तोंडाला मास्क लावणे हे आवश्यक असून तसा शासनाचा नियम सुद्धा आहे. तरीही बरेच जण हे रस्त्यावर जाताना तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 200 जणांवर कारवाई केली आहे.

20 मार्च ते 30 ऑगस्ट या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघण करणाऱ्याच्या 209 हजार 75 प्रकरणात तब्बल 49 हजार 93 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 8 हजार 168 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 19 हजार 278 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. 21 हजार 647 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.

लॉकडॉऊनच्या दरम्यान कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 1 हजार 923 गुन्हे दाखल करण्यात आले असून मध्य मुंबईत 2 हजार 636 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर पूर्व मुंबई तब्बल 3 हजार 354 गुन्हे दाखल झाले आहेत. तर पश्चिम मुंबईत 3 हजार 510 उत्तर मुंबईत 9 हजार 552 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details