महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jan Ashirvad Yatra: केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह १३ भाजप कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका, 'हा' होता आरोप - Narayan Rane

जगभर कोरोना महामारीची साथ असलेल्या काळामध्ये जन आशीर्वाद यात्रा पक्षाने आयोजित केली होती. मात्र त्यामध्ये सामाजिक अंतराचे पालन केले नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मुंबईत या संदर्भात नियम मोडल्यामुळे दाखल गुन्ह्यामध्ये आमदार तमिळ सेल्वनसह इतर 13 भाजपच्या कार्यकर्त्यांची कनिष्ठ न्यायालयाने आज सुटका केली.

Union Minister Narayan Rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे

By

Published : Jun 1, 2023, 10:49 PM IST

मुंबई: जगभर कोरोना महामारीची साथ होती. त्यावेळेला मुंबई महाराष्ट्रात देखील शासनाने महामारीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात सामाजिक अंतर ठेवावे असे सक्तीचे केले होते. त्याच काळामध्ये जन आशीर्वाद यात्रा भारतीय जनता पक्षाच्या वतीने काढण्यात आली होती. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी त्या संदर्भात नियम मोडले म्हणून गुन्हे दाखल झाले होते. परंतु शिवडी येथील कनिष्ठ न्यायालयाने यासंदर्भात कोणत्याही गुन्हे सिद्ध होऊ शकत नसल्यामुळे, त्यांचे पुरावे न्यायालासमोर सादर केल्या नसल्यामुळे आमदार तमिळ सेलव्हनसह इतर 13 भाजप कार्यकर्त्यांची अखेर मुक्तता केली.




पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले: भाजपचे आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांच्यासह १३ भाजप कार्यकर्त्यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. या सर्व आरोपींमध्ये भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील होते. त्यांच्यावर देखील कोरोना महामारीच्या संदर्भातील सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन न केल्याचा आरोप होता.



आदेशाचे पालन केले नाही: 19 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी चेंबूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या शबरी हॉटेलच्या परिसरामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ही यात्रा काढल्यामुळे, साथीचा रोग अधिक प्रमाणात पसरला अशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तसेच त्यावेळेला आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशाचे पालन देखील जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांनी आणि कार्यकर्त्यांनी केले नाही.


न्यायालयाने निर्दोष सुटका केली: याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ७ जुलै २०२२ रोजी आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. मात्र जरी याबाबत गुन्हा दाखल होतात तरी, आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आले नाही, असे निरीक्षण नोंदवत महानगर दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी आमदार तमिळ सेल्वन, नगरसेविका राजश्री शिरवडकर यांच्यासह एकूण १३ आरोपींची शिवडी न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

हेही वाचा -

  1. नाणार प्रकल्पाबाबत नारायण राणेंची घोषणा म्हणाले
  2. Video जन आशीर्वाद यात्रा तर होणारच शिवसेनेच्या राड्यानंतर प्रमोद जठारांची प्रतिक्रिया
  3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या असहिष्णुतेचे जनक आशिष शेलार

ABOUT THE AUTHOR

...view details