मुंबई - नागपाड्यातील अब्दुर्रहमान आणि मिश्रा या इमारतींचा काही भाग आज कोसळला. या कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती महानगरपालिका व अग्निशामक दलाने व्यक्त आहे. सध्या मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व आमदार अमीन पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आव्हाड यांनी दिले.
नागपाडा इमारत दुर्घटना: चौकशी करून दोषींवर कारवाई होईल - जितेंद्र आव्हाड - नागपाडा इमारत दुर्घटना न्यूज
आज नागपाड्यातील अब्दुर्रहमान आणि मिश्रा या इमारतींचा काही भाग कोसळला. घटनास्थळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व आमदार अमीन पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आव्हाड यांनी दिले.
या इमारती म्हाडाकडे रिडेव्हलपमेंटसाठी नव्हत्या. सिरसीवाला नावाच्या एका बिल्डरला येथील रहिवाशांनी रिडेव्हलपमेंटसाठी दिली होती. मात्र, रहिवासी आणि बिल्डर यांच्यातील वादामुळे इमारतीचा विकास रखडला होता. रहिवाशांनी बाथरूम आणि भिंती बांधून द्या, अशी तक्रार केली होती. मात्र, बिल्डरने याकडे दुर्लक्ष केले आणि तोच भाग आज झालेल्या दुर्घटनेत पडला, असे आव्हाड यांनी सांगितले.
प्रथम दर्शनी असणाऱया परिस्थीतीनुसार बिल्डरवर एफआयआर दाखल होईल. त्यानंतर त्याची चौकशी होऊन तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. सध्या या इमारतींमध्ये काहीजण अडकल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना बाहेर काढण्याचे काम अग्निशामक दल व एनडीआरएफ करत आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.