महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक - महिलेचे अश्लील फोटो

Mumbai Crime News : महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या आरोपीला शिवडी पोलिसांनी अटक केलीय. तसंच एका चाळीस वर्षीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीलाही शिवडी पोलिसांनी पश्चिम बंगालहून ताब्यात घेतलं आहे.

accused who uploaded obscene photos of women on social media was arrested by the police from west bengal
महिलांचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्याला पश्चिम बंगालहून पोलिसांनी केली अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 9:31 AM IST

Updated : Dec 30, 2023, 1:12 PM IST

मुंबई Mumbai Crime News :शिवडी पोलीस ठाण्यात 30 ऑक्टोबरला महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्या प्रकरणी साजिद अब्दुल कलाम शेख विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरुन कलम 66 क, 66 इ आणि 67 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात शिवडी पोलिसांना यश आलं असल्याची माहिती शिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे यांनी दिलीय.

लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक :8 डिसेंबरला एका चाळीस वर्षीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपी अफिदी मकमुद्दीन शेख (वय 26) विरोधात पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संविधान कलम 376, 376 (2) (ब), 313 आणि 317 अन्वये हा गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला.

दोन्ही आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक :दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असतानाच दोन्ही आरोपी पश्चिम बंगाल राज्यातील ग्राम धनतोला येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पश्चिम बंगालमधील इस्लामपूर पोलीस ठाणे आणि अलिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे दोन्ही आरोपी लपले होते. त्यानंतर शिवडी पोलीस ठाण्याच्या पथकानं तेथे जाऊन शोध घेत दोन्ही आरोपींना अटक केली. तसंच दोघांनाही मुंबईत आणण्यात आलं. शनिवारी (30 डिसेंबर) या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. सदरील कारवाई शिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर काळेकर, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी पार पाडलेली आहे.

हेही वाचा -

  1. सोशल मीडियातील जाहिरातींपासून सावध! ढोंगी ज्योतिषी बनून महिलेला घातला 16 हजारांचा गंडा, जळगावमधून दोघांना अटक
  2. Online Fraud: ऑनलाइन मागवली दारू, क्रेडिट कार्डद्वारे उकळले दोन लाख; राजस्थान येथून आरोपीला अटक
  3. 'कायद्याच्या चौकटीत राहून नववर्षाचं स्वागत करा'; 'थर्टी फर्स्ट'साठी मुंबई पोलिसांची फैज तैनात, हुल्लडबाजांना दिला दम
Last Updated : Dec 30, 2023, 1:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details