मुंबई -जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर संशयीतरित्या फिरणाऱ्या इफियुचुकू पीयूस या नायजेरियन व्यक्तीला एनसीबीने ताब्यात घेतले होते. ताब्यात घेताच त्याने स्वतःजवळ असलेल्या 12 कोकेनच्या गोळ्या गिळल्या होत्या.
'एनसीबी'समोर कोकेनच्या गोळ्या गिळणाऱ्याची रुग्णालयातून सुटका - Mumbai city news
जुहू येथे इफियुचुकू पीयूस या नायजेरियन व्यक्तीला एसीबीने ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने जवळ असलेल्या कोकेनच्या 12 गोळ्या गिळल्या होत्या. त्यानंतर त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला उपचारानंतर आज (दि. 18 जाने.) रुग्णालयातून सोडण्यात आले.
इफियुचुकू पीयूस
प्रत्येक गोळीमध्ये 1 ग्रॅम कोकेन असल्याने 12 ग्रॅम कोकेन त्याने गिळले होते. त्यामुळे पथकाने तत्काळ जेजे रुग्णालय संबंधितास नेले होते. त्यानंतर एक्स-रे व सिटीस्कॅन करण्यासाठी करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तस्कराने तब्बल 12 कोकेनच्या गोळ्या गिळल्या असल्याचे समोर आले. वैद्यकीय उपचारानंतर 18 जानेवारी रोजी या आरोपीला रुग्णालयातून सोडण्यात आले.
हेही वाचा -'गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले'