मुंबई:सांताक्रुज पश्चिम येथील सागर रोडवर असलेल्या अंबेझार बिल्डींगमधील रूममधील 101 आणि 201 या फ्लॅटमध्ये 13 एप्रिलला घरातील मंडळी झोपलेले असताना रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ते 14 एप्रिलच्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फ्लॅटच्या अर्धवट उघड्या खिडकीतून आरोपीने घरात प्रवेश केला. कोणीतरी अज्ञात इसमाने फ्लॅटमधील मालमत्ता चोरी केली. तसेच तक्रारदार यांच्या राहत्या फ्लॅटच्या वरच्या मजल्यावर राहणारे दिलीप गोयल यांचा रेड मी कंपनीचा मोबाईल तसेच रोख रक्कम 6 हजार रुपये चोरी केले असल्याचे फिर्यादीने सांगितले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता.
'हा' मुद्देमाल चोरीला: दोन सोन्याच्या अंगठ्या, रेड मी कंपनीचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचा j 6 मोबाईल, सिसका कंपनीची पॉवर बँक, मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम 7 हजार रुपये असा एकूण 70 हजारांची मालमत्ता चोरट्याने लंपास केली.
आरोपीस अटक: त्याचप्रमाणे दुसऱ्या फ्लॅटमधून सोन्याच्या अंगठ्या, सॅमसंग कंपनीचा j 6 मोबाईल, सिसका कंपनीची पॉवर बँक, मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मोबाईल असा एकूण 56 हजार रुपयांचा मुद्देमान चोरट्याने पळवला. आरोपी संतोष सुरेश चौधरी (वय 22 वर्षे) हा अंधेरी पश्चिम येथे राहणारा आहे. त्याला 14 एप्रिलला सायंकाळी साडेपाच वाजता अटक करण्यात आली. आरोपीच्या राहत्या परिसरात जाऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली.