मुंबई : कुबेर म्युचल फंड या कंपनी विरोधात फसवणूक केल्या प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपी मुकेश मोहन शर्मा याचे मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्याच्या अभावी निर्दोष सूचना करण्यात आली आहे. मुकेश शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयातून 23 वर्षानंतर निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
Kuber Mutual Fund Case : कुबेर म्युचूअल फंडमधील आरोपी मुकेश मोहन शर्मा यांची 23 वर्षाने निर्दोष सुटका - मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल
कुबेर म्युचूअल फंडमधील आरोपी मुकेश मोहन शर्मा यांची 23 वर्षाने निर्दोष सुटका करण्यात आली आहे. कुबेर म्युचल फंड या कंपनी विरोधात फसवणूक केल्या प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कुबेर म्युच्युअल फंड प्रकरण : कुबेर म्युच्युअल फंड या कंपनीने सन 2000 मध्ये लोकांना पैसे घेऊन जाणे काही महिन्याच्या मदतीने वाढवून देण्याच्या आश्वासन देऊन 3 हजार कोटी रुपये वसूल केले होते. त्यानंतर या प्रकरणात काही ठेवीदार यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून प्रद्युमन मोहन शर्मा आणि मुकेश मोहन शर्मा या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
23 वर्षांपासून या प्रकरणात सुनावणी : मुंबई सत्र न्यायालयात गेल्या 23 वर्षांपासून या प्रकरणात सुनावणी सुरू होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रद्युमन मोहन शर्मा यांचा ट्रायल दरम्यान खटला सुरू असताना मृत्यू झाला होता त्यामुळे या प्रकरणातील आरोपी मुकेश शर्मा यांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला होता की या प्रकरणातील कुठलीही माहिती त्यांना नव्हती तसेच या कंपनीशी सर्व व्यवहार आणि सर्व गोष्टी प्रद्युमन मोहन शर्मा हेच पाहत होते मुकेश शर्मा त्यांच्या विरोधात कोर्टासमोर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने कोर्टात सादर केलेले पुरावे अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.