महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : पतीने केली पत्नीची हत्या; आरोपीला केली पोलिसांनी अटक, वाचा काय आहे प्रकरण - मुंबई

मुंबई शहरातील धारावीत २४ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. मृत महिलेचा हु़ंड्यासाठी छळ केला जात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Crime
पतीने केली पत्नीची हत्या

By

Published : Feb 13, 2023, 3:32 PM IST

मुंबई : हुंडाबळीच्या प्रकरणात मुंबई शहरातील धारावी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. धारावीत २४ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात हत्येच्या भारतीय दंड संविधान कलम 302 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून मृत महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

आत्महत्या केल्याचा बनाव : पत्नीच्या हत्येप्रकरणी धारावी पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव कन्हैयालाल सरोज (२६) असे आहे. तसेच याप्रकरणी सासू आणि सासऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना धारावी परिसरातील शताब्दी नगरची आहे. रोशनी सरोज असे या मृत मुलीचे नाव आहे. रोशनीच्या सासरच्या मंडळीने मुलीच्या वडिलांना आत्महत्या केल्याचे दाखविण्यात आले. मात्र संबंधित घटनेत आरोपीने खोटा बनाव रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांना मृत मुलीच्या पालकांनी तिचा हुंड्यासाठी महिलांचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता अशी माहिती दिली आहे.

आत्महत्या नसून हत्याच : धारावी पोलिसांनी शताब्दी नगर येथील घटनास्थळ दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला. नंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यावेळी प्राथमिक वैद्यकीय अहवालात महिलेची हत्या करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धारावी पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली पतीला अटक केली असून सासू सासरे यांची देखील पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती धारावी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, आरोपीची सखोल चौकशी केली जात आहे.

वांद्रे पूर्वेत महिलेची आत्महत्या : निर्मल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून महिलेच्या पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस तपास करत आहेत. कोर्टात या प्रकरणाचा लवकरच निकाल लागेल.

मागील काही दिवसांपूर्वीच घडली घटना : मुंंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील जुहू परिसरात एका बागेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिक जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कुपर रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. जुहू पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. हा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

हेही वाचा :Mumbai Police : मीरा-भाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा सहपोलीस आयुक्तांना फोन, पोलिसांकडून तपास सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details