महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोपी सहकार्य करत नाहीत; डॉ. पायलच्या वकिलांसह पोलिसांचा आरोप, आरोपींना १० जूनपर्यंत कोठडी

डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीमध्ये  तिन्ही आरोपींना दहा जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : Jun 3, 2019, 6:25 PM IST

Updated : Jun 3, 2019, 10:23 PM IST

मुंबई- डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीमध्ये तिन्ही आरोपींना दहा जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. घटना घडल्यापासून अद्याप सुसाईड नोट मिळालेली नाही. ती नोट आरोपींनीच लपवलेली आहे, असा आरोप डॉक्टर पायल तडवी यांच्या वकिलांनी केला आहे. तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील आरोपी सहकार्य करत नसल्याचे न्यायालयात सांगितले.

तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांनी डॉ. पायल यांना कामावरून आरडाओरड केली होती, परंतु त्यांची रॅगिंग केली नव्हती अशी बाजू आरोपींच्या वकिलांनी मांडली. त्यानुसार अजून पुढील चौकशीसाठी पोलीस आणि आरोपींच्या वकिलांनी वेळ मागितला त्यानुसार न्यायाधीशाने त्यांना 10 जून पर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे स्पष्ट केले.

डॉ. भक्ती मेहरे हिच्या पालकाची प्रतिक्रिया

डॉक्टर पायल तडवी प्रकरणात न्यायालयात पायल यांची बाजू अॅड. नितीन सातपुते हे मांडत होते. परंतु त्यांचा युक्तिवाद कमी पडल्याने आता डॉ. पायल यांची बाजू राजा ठाकरे हे मांडत आहेत. तसेच आरोपी डॉक्टर महिलांचे वकीलपत्र अॅड. कोंडा यांनी घेतले आहे. आतापर्यंत दोन वेळा डॉ. पायल प्रकरणातील केसच्या तारखा लागल्या आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षातील लोकांनी आपला युक्तिवाद लढवत बाजू मांडल्या.

डॉ. पायल यांच्या घरच्यांच्या मागणीनुसार हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे देखील देण्यात आलेले आहे. आजही या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. परंतु सुनावणी समाधानकारक झालेली नाही. कारण आरोपी योग्य सहकार्य करत नसल्याने गुन्हे शाखेने व डॉ. पायल यांच्या वकिलांनी अधिक चौकशीसाठी पुढील वेळ मागितली. त्यानुसार न्यायालयाने या आरोपींना दहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तसेच आरोपींच्या वकिलांनी पायल तडवी यांचा खून झालेला नसून ही आत्महत्या आहे, अशी बाजू मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आरोपींच्या कुटुंबियांनी आपल्या मुलींवर होत असलेले आरोप हे खोटे आहेत, असे प्रचार माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच डॉ. पायल यांचे वकील पायलने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती, असे पहिल्या सुनावणी पासून सांगत आहेत .परंतु त्यांना अद्यापही कोणत पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे या केसची सुनावणी पुन्हा पुढे सरकलेली आहे. असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगतले.

Last Updated : Jun 3, 2019, 10:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details