मुंबईMumbai Crime News: शताब्दी रुग्णालयातील (Mumbai Shatabdi Hospital) एका कर्मचाऱ्यानं बाथरुममध्ये मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीला सफाई कामगार चोरून पाहण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात गोवंडी पोलिसांनी (Govandi Police) गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार गोवंडी पोलिसांनी भारतीय दंड संविधानाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी हा शताब्दी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करतो.
आंघोळ करताना कर्मचाऱ्यानं भिंतींवर चढून पाहिलं : शनिवार 2 डिसेंबरला मुंबईतील शताब्दी रुग्णालयात 27 वर्षीय विद्यार्थिनी तिच्या एका कॉन्फरन्ससाठी गेली होती. त्यानंतर फ्रेश होण्यासाठी तिच्या वसतीगृहावर आली. त्यावेळी बाथरुमध्ये ती आंघोळ करताना सफाई कर्मचाऱ्यांनी चोरून पाहण्याचा प्रयत्न केला. या हॉस्टेलमध्ये महिला आणि पुरुष यांचे बाथरूम शेजारी शेजारी आहेत. त्यावेळी विद्यार्थिनी आंघोळ करताना रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने भिंतींवर चढून तिला चोरून पाहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने कर्मचाऱ्याला खिडकीत पाहिल्यावर तिने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो तिथून पळून जात असताना, त्याला रुग्णालयातील लोकांनी पकडलं. मुलीच्या तक्रारीवरुन गोवंडी पोलिसांनी आरोपीला अटक (Govandi Police Arrested Accused) केली. सध्या या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.