मुंबई:दहिसर पोलिस स्टेशनचे पीआय राम पोटे यांनी सांगितले की, आरोपी भाविन कोळेकर (26) हा बोरिवली येथील रहिवासी आहे. त्याची ओळख दहिसर रावळ पाडा येथील केतुल पटेल (30) याच्याशी आहे. दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. आरोपी रावल पाडा येथे गेला असता पटेल आपल्या कार्यालयात जात होते. भाविनने पटेल यांना दुचाकीवरून बोरिवलीला जाण्यासाठी लिफ्ट देण्यास सांगितले असता पटेल यांनी उशीर होत असल्याने लिफ्ट देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे रागाच्या भरात लाल भावीन याने सोबत आणलेल्या चाकूने पटेल यांच्या हातावर, मानेवर व पाठीवर तीन वार केले व तेथून पळ काढला. माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पटेल यांना शताब्दी रुग्णालयात पाठवले. दहिसर पोलिसांनी आरोपी भाविनला खुनाच्या प्रयत्नाच्या कलमान्वये अटक केली आहे. भावीनवर यापूर्वीही मारहाण आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहेत.
Dahisar Police Action : लिफ्ट न दिल्याने मित्रावर चाकूने हल्ला करणारा आरोपी अटकेत - शताब्दी रुग्णालय
दुचाकीला लिफ्ट न दिल्याने मित्रावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या दहिसर पोलिसांनी अटक (Accused arrested for attacking friend with a knife) केली आहे.जखमी तरुणावर शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital) उपचार सुरू आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी (Dahisar Police) आरोपीला अटक केली आहे.
चाकू हल्ला करणारा आरोपी