महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करून चालत्या डब्यातून बाहेर फेकणाऱ्यास अटक - मुंबई रेल्वे पोलीस बातमी

महिलांच्या डब्यात घुसून एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करुन धावत्या रेल्वेतून बाहेर फेकण्यात आले होते. याप्रकरणी जीआर पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपीसह पोलीस पथक
आरोपीसह पोलीस पथक

By

Published : Jan 5, 2021, 3:03 PM IST

Updated : Jan 5, 2021, 4:45 PM IST

मुंबई- महिलांच्या डब्यात घुसून एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करुन तिला चालत्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले होते. ही घटना 1 जानेवारीला हार्बर मार्गावरील वडाळा ते पनवेल स्थानका दरम्यान घडली होती. या प्रकरणातील आरोपींच्या जी.आर. पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राजू बंड्या पांडे (वय 30 वर्षे) यास कोपरखैरने परिसरातून अटक करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही

वडाळा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध सुरू

1 जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता पनवेल ते वडाळा दरम्यान आरोपी राजू बंड्या पांडे हा महिलांच्या डब्यात शिरुन त्याने एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या महिलेने त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने चालत्या रेल्वेतून या महिलेला ढकलून देऊन पसार झाला होता. याबाबत वडाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर जीआरपी गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध घेतला जात होता.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा घेतला शोध

सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जात असताना सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती ही कोपरखैरणे परिसरात राहत असून एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील ठिकाणी धाड मारून या आरोपीची शहानिशा केली. त्यावेळी सीसीटीव्हीत दिसणारा हा आरोपी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेचच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा -...तर प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार; बाळासाहेब थोरातांचे मोठे वक्तव्य

हेही वाचा -'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’!

Last Updated : Jan 5, 2021, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details