मुंबई - वडाळा येथील खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. खुनातील आरोपी फझुल रहेमान कुरेशी याला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या २० एप्रिलला वडाळा टीटी परिसरात पत्नीचा खून करून तो पसार झाला होता.
पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला दिल्लीतून अटक - आरोपी
आरोपी दिल्लीमधील चांदबाग परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. यासंदर्भातील पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव करीत आहेत.
आरोपीने गेल्या २० एप्रिलला किरकोळ वादातून पत्नी रिताची हत्या केली. त्यानंतर पाठीमागे कुठलाही पुरावा न सोडता तो पसार झाला. तो विक्रोळी टागोर नगर येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजाताच त्याने त्याठिकाणाहून पळ काढला.
पोलिसांनी चौकशी केली असता तो दिल्लीकडे पसार झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचे वेळी वडाळा पोलिसांचे एक पथक दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर आरोपी दिल्लीमधील चांदबाग परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. यासंदर्भातील पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव करीत आहेत.