मुंबई: एनआयए कडून कोर्टात (Special NIA Court) माहिती देण्यात आली की, अटक करण्यात आलेला आरोपी आरिफ शेख (Accused Arif Sheikh) आणि शब्बीर शेख या दोन्ही आरोपींकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (underworld don dawood ibrahim) साथीदार छोटा शकील (Chhota Shakeel) सोबत आर्थिक व्यवहार झाला आहे. यासंदर्भातील माहिती आणि आर्थिक व्यवहार कुणासोबत झाला आणि कशा पद्धतीने झाला या सर्व माहिती घेणे आवश्यक असल्याने दोन्ही आरोपींची कोठडी आवश्यक आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 8 दिवसाची 20 मेपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गँगविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा फास आवळत आहे . गुरुवारी रात्री उशिरा छापेमारी करुन दाऊद गँगमधील दोन हस्तकांना एनआयएने अटक केली. हे दोघेही दाऊद गँगसाठी पैसे जमा करण्याचे काम करत होते. ते फंडिगसाठी बॉलिवूडमधील अनेकांना धमक्या देत होते. हे दोघेही दाऊदचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या छोट्या शकीलशी थेट संपर्कात असल्याचे पुरावेही एनआयएला मिळाले आहेत. छोटा शकीलच्या विरोधात यापूर्वीच इंटरपोलमे रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
मुंबईच्या बाहेर राहून छोटा शकील सातत्याने मुंबईत खंडणी, ड्रग्ज आणि दहशतवाद पसरवण्याचे काम करीत असल्याची एनआयएच्या सूत्रांची माहिती आहे . दिल्ली , मुंबईसह देशाच्या वेगवेगळअया शहरांत हिंसा भडकवण्यासाठी या टेरर फंडगिंचा वापर करण्यात येतो. या प्रकरणी एनआयए तपास करीत आहे. याच प्रकरणात मुंबई 24 ठिकाणी तर मिरा भाईंदरमध्ये 5 ठिकाणी 9 मे रोजी छापे टाकण्यात आलेत. या प्रकरणात दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा आणि छोटा शकीलचा मेव्हणा सलीम या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते . यांच्यासह अन्य 18 जणांची या प्रकरणात एनआयएकडून चौकशी सुरु आहे.
दाऊद आणि त्याच्याशी संबंधितांचा लष्कर ए तोयबा , जैश ए मोहम्मद आणि अल कायदासहित आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी सक्रिय संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यूएपीएच्या कायद्यांर्गत अटक करण्यात आलेल्या दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीत त्याने ही माहिती समोर आली आहे. मुंबईतून फंडिंग उभारण्याचे काम दाऊदकडून सुरु आहे. डी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवागी नेटवर्कमध्ये दाऊद, त्याचा सहकारी हाजी अनीस , छोटा शकील , जावेद पटेल , टायगर मेनन याच्यासह अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे .