मुंबई :फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानिया यांनी अमृता फडणवीस यांच्याशी आधी ओळख वाढवली. त्यांना फसवण्याच्या उद्देशाने एक कोटी रुपयांचे अमिष देण्याचा प्रकार केला. याबाबत अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत संवाद साधला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विशिष्ट पद्धतीची रचना केली. अखेर आरोपी अनिक्षा जयसिंगानिया अमृता फडणवीस यांना लाच देऊन एका प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले.
सापळा रचून आरोपीला पकडले :तब्बल दीड वर्षापासून अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क ठेवून असलेली अनिक्षा जयसिंघानिया हिने हा सगळा प्रकार केला आहे. आरोपी असलेल्या अनिक्षा जयसिंगानिया हिने फेब्रुवारी महिन्यामध्ये अमृता फडणवीस यांना संपर्क केला. संपर्क केल्यावर फोनवरून अनिक्षाने अमृता फडणवीस यांना सांगितले की, तिच्या वडिलांचे एका प्रकरणात आरोपी म्हणून नाव आलेले आहे. यातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, अनिक्षाचे हे वाक्य ऐकताच अमृता फडणवीस यांनी फोन बंद केला. तिचा नंबर देखील ब्लॉक केला. यानंतर पोलिसांमध्ये त्यांनी 20 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला बरोबर पकडण्याचा प्रयत्न केला.