महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झालेला आरोपी तब्बल आठ वर्षांनतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात - मुंबई गुन्हे बातमी

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला. मात्र, पॅरोलवर सुटल्यानंतर तब्बल आठ वर्षे फरार राहिलेल्या आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने अटक केलेली आहे.

अश्विन सपकाळे
अश्विन सपकाळे

By

Published : Jun 25, 2021, 3:05 AM IST

मुंबई- खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला. मात्र, पॅरोलवर सुटल्यानंतर तब्बल आठ वर्षे फरार राहिलेल्या आरोपीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने अटक केलेली आहे.

पॅरोलवर कारागृहाबाहेर आला अन् पुन्हा गेलाच नाही

12 डिसेंबर, 1999 रोजी नरेश परमार या व्यक्तीची पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून अश्विन सपकाळे या आरोपीने तलवारीने हत्या केली होती. या प्रकरणात समतानगर पोलीस ठाण्याकडून त्यास अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या आरोपीची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली होती. हा आरोपी 25 जुलै, 2012 रोजी तात्पुरत्या पॅरोलवर सुटून बाहेर आला होता. एक महिन्याचा पॅरोल संपल्यानंतर अश्विन सपकाळे यास पुन्हा तुरुंगात जाणे गरजेच होते. मात्र, गेली आठ वर्ष हा आरोपी फरार होता.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरत होता

गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेच्या युनिट 12 कडून या आरोपीचा शोध घेतला जात होता. हा आरोपी स्वतःचे अस्तित्व लपून कांदिवली पूर्व व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरत असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर तांत्रिक तपास करत या आरोपीला कांदिवली पूर्व येथून अटक केली आहे.

हेही वाचा -कांदिवली बोगस लसीकरण; गुजरात, दिव दमण येथून लस आल्याची सिरमची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details