मुंबई -राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या बंगल्यावर गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात 90 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या मुद्द्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च या बंगल्यांवर करण्यात आला आहे. जलसंपदा विभाग, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च झाला आहे. आरोग्य विभागावर जी तरतूद आहे. त्यात 50 टक्केही खर्च करण्यात आलेला नाही. मात्र, बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
सरकारचे कंत्रादारांच्या हाताकडे लक्ष -
सध्याची परिस्थिती पाहता आपात्कालीन परिस्थितीत कशावर खर्च करायचा? कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे? याचे भान सरकारला असायला हवे. मात्र, कंत्राटदारांचे हित आणि त्यातून मिळणारा मलिदा याकडे सरकारचे लक्ष असल्याची, टीका दरेकर यांनी केली. तसेच हे सरकार कंत्राटदार धार्जीणे असल्याचे देखील ते म्हणाले.
दुरुस्तीसाठी इटालियन मार्बल -