महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, ५ ठार तर ५ गंभीर - खोपोलीजवळ अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला असून यात पाच प्रवासी ठार झाले आहेत. तर पाच जण जखमी झाले आहेत.

अपघात बातमी
अपघात बातमी

By

Published : Feb 16, 2021, 8:09 AM IST

Updated : Feb 16, 2021, 4:00 PM IST

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनरने इनोव्हा, क्रेटा कार, टेम्पो आणि ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ट्रेलरने पाठीमागून धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळली.

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात, पाच ठार

महामार्गावरील फूडमॉलजवळ अपघात

पुण्याहून मुंबईकडे ही वाहने जात असताना मुबंई-पुणे महामार्गावरील मुबंई लेनवरील किमी फुडमॉलजवळ ही घटना घडली. एका कंटेनरने इनोव्हा, क्रेटा कार, टेम्पो आणि ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात या वाहनांमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील दोन जखमींना अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतांना खोपोली रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कसा झाला अपघात?

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार उलटलेल्या टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठी मागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघातातील दोन्ही कारचा चक्काचुर झाला आहे. या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु घाटात मुंबईकडे जाताना दोन कार पुढे निघुन गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला. पाच वर्षीय चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये डॉ. वैभव वसंत झुंझांरे (41, नेरुळ) याच्यांसह त्यांची पत्नी वैशाली झुंझारे (38), आई उषा झुंझारे (63), पाच वर्षांची मुलगी श्रिया झुंझारे (5) या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक 11 वर्षांचा मुलगा अर्णव झुंझारे हा गंभीर जखमी झाला आहे. त्यासह मंजू प्रकाश नाहर (58, गोरेगाव) यांचाही मृत्यू झाला आहे. तर कांबळे (30), प्रकाश हेमराज नाहर (65), किशन चौधरी, काळूराम जमनाजी जाट हे या अपघातात जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

अपघातानंतर वाहतूक कोंडी -

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून प्रवाशांना पुढील उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला काढण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

Last Updated : Feb 16, 2021, 4:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details