रत्नगिरी -कोकण रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेसला शनिवारी पहाटे ४.१५ वाजताच्या सुमारास करबुडे बोगद्यात अपघात झाला. हजरत-निजामुद्दीन मडगाव ही एक्सप्रेस करबुडे बोगद्यात आली असता, रल्वेचे इंजिन रुळावरून घसरले. बोगद्याच्या आत एक किलोमीटरवर अंतरावर ही घटना घडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेसला अपघात; करबुडे बोगद्यात इंजिन घसरले - kokan railway accident
कोकण रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेसला शनिवारी पहाटे ४.१५ वाजताच्या सुमारास करबुडे बोगद्यात अपघात झाला. हजरत-निजामुद्दीन मडगाव ही एक्सप्रेस करबुडे बोगद्यात आली असता, रल्वेचे इंजिन रुळावरून घसरले. बोगद्याच्या आत एक किलोमीटरवर अंतरावर ही घटना घडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
राजधानी एक्सप्रेसला अपघात
या अपघाताची माहिती मिळताच कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. या मार्गावरून रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काही तासांचा अवधी लागणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त वाचा थोड्या वेळात......
Last Updated : Jun 26, 2021, 7:24 AM IST