महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खारकोपर-उरण विभागाच्या चौथ्या कॉरिडोरच्या पायाभूत प्रकल्पाला गती

मध्य रेल्वेने बेलापूर-सीवूड्स-उरण या 27 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पातील उर्वरित 14.60 किलोमीटर खारकोपर-उरण मार्गाच्या चौथ्या कॉरिडोरच्या पायाभूत प्रकल्पाला गती दिली आह.

mumbai
mumbai

By

Published : Aug 16, 2020, 5:25 PM IST

मुंबई - लॉकडाऊन व अनलॉक कालावधी दरम्यान मध्य रेल्वेने अनेक पायाभूत सुविधा पूर्ण करण्यावर भर दिला आहे. 27 किलोमिटर लांबीच्या बेलापूर-सीवूड्स-उरण प्रकल्पातील उर्वरित 14.60 किलोमीटर खारकोपर-उरण मार्गाच्या चौथ्या कॉरिडोरच्या पायाभूत प्रकल्पाला गती दिली आहे. संपूर्ण लाईन पूर्ण झाल्यावर मुंबई-उरणमधील अंतर जवळपास 40 ते 50 टक्के कमी होईल.

मध्य रेल्वेच्या निर्माण विभागाने या प्रकल्पाची गती वाढविल्यामुळे रेल्वेला मुंबई ते जवाहरलाल नेहरू बंदरातील हा महत्त्वपूर्ण प्रवेश योग्य रेल्वेमार्ग पूर्ण करता येईल. खारकोपर-उरण नवीन मार्ग बांधण्याचे काम विविध ठिकाणी बांधकाम यंत्रणेच्या सहाय्याने चालू आहे. पाइल्स बोरिंग मशीन, काँक्रीट प्लेसर बूम, ट्रान्झिट मिक्सर, ट्रिपर्स, जेसीबी, हायड्रस, पोकलेन्स, हायड्रॉलिक जॅक्स इत्यादींसह मुख्य बांधकाम उपक्रम सुरू आहेत.

रांजनपाडा स्थानकावरील कव्हर-ओव्हर प्लॅटफॉर्मचे सुपरस्ट्रक्चरचे काम, न्हावा-शेवा, द्रोणागिरी व उरण स्थानकांवर पाया व उप-रचना काम, उरण येथील सब-वे काम, चैनेज 10975 येथे पूल फाउंडेशनचे काम, स्ट्रेसिंग आणि 7982 पुलावरील यू-गर्डर खाली करण्यात आली आहेत.

खारकोपर-उरण दरम्यान 5 स्थानके, 2 मोठे पूल, 41 छोटे पूल, 2 रोड अंडर ब्रिज आणि 4 रोड ओव्हर ब्रिज असतील. चैनेज 8 किलोमिटर ते चैनेज 11 किलोमिटर दरम्यान 4.479 हेक्टर जमीनीची व्यवस्था (बहुतेक वनजमिनी) सिडकोकडून अद्याप करवून द्यायची बाकी आहे.

मध्य रेल्वे मुंबई उपनगरी नेटवर्कचा चौथा कॉरिडोर असलेला बेलापूर-सी वूड्स-उरण रेल्वे मार्ग, पूर्ण झाल्यामुळे मुंबई ते जेएनपीटी व उरण या प्रवाशांच्या प्रवासाची वेळ कमी होईल व नवी मुंबईत नवीन तयार होत असलेल्या विमानतळावर जाण्याची सोयही प्रवाशांना होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details