आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांना नोटीस मुंबई :आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांना नोटीस बजावली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि कुटुंबीयांना एसीबीने मालमत्तेसंदर्भात शुक्रवारी चौथ्यांदा नोटीस बजावली आहे. एसीबीच्या सर्व प्रश्नांना उत्तर देत आलो आहे. या सर्व लढ्यात माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना आमदार साळवी यांनी व्यक्त केल्या. विधान भवनात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मालमत्ते संदर्भात चौकशी सुरु: साळवी बोलताना म्हणाले की, गेल्या चार महिन्यापासून ACB च्या माध्यमातून मालमत्ते संदर्भात चौकशी सुरु आहे. मी चार वेळा चौकशीला गेलो. आज माझी बायको मूले आणि इतर सदस्य यांना संध्याकाळी पाच वाजता बोलवण्यात आलेले आहे. मी इथले काम संपवून संध्याकाळी कुटुंबासहीत हजर राहणार आहे. आज आणि उद्या आमची चौकशी होणार आहे. कितीही चौकशी झाली तरी मी उद्धव साहेब यांच्यासोबत राहणार. मी कोणत्या अडचणीला महत्व देत नाही आणि अशा चौकशीला घाबरत नसल्याचे आमदार साळवी यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा:एसीबीने पाठवलेल्या पहिल्या नोटीस पासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतो आहे. एसीबीच्या चौकशीला जाण्यापूर्वी पक्षप्रमुखांशी बोलणे करतो. पक्षप्रमुख ठाकरे वारंवार मला एकच सांगतात, राजन तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको असा धीर देऊन मनोबलही उंचावतात, असे आमदार साळवी यांनी सांगितले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी: महाविकास आघाडी काळात शिंदे गटातील अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर होते. शिवसेनेत फूट पडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार, १३ खासदार यांच्या सोबत भाजप पाठिंबा दिला. राज्यात सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर शिंदें सोबत गेलेल्या नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी थंडावली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू झाला आहे.
हेही वाचा:MLA Rajan Salvi News आमदार साळवी यांचे कुटूंब एसीबीच्या रडारवर काय म्हणाले राजन साळवी