महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Ac locals: पांढरा हत्ती बोलले जाणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद; तिकीट दरातील कपातीचा परिणाम

रेल्वेला मुंबईकर प्रवाशांची लाईफलाईन म्हणून ओळख आहे. या रेल्वेमधून दिवसाला ७० लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना चांगला, आरामशीर प्रवास करता यावा म्हणून रेल्वेने एसी लोकल सुरु केली. रेल्वेकडून चालवली जाणारी एसी लोकल म्हणजे पांढरा हत्ती असे म्हटले जात होते. या लोकलमधून चार ते पाच प्रवासी प्रवास करत असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते. सुरुवातीला या एसी लोकलला प्रवाशांचा प्रचंड विरोध झाला. मात्र आता याच एसी लोकलला आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Good response from passengers to AC local
एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

By

Published : Mar 14, 2023, 10:54 AM IST

एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

मुंबई: मध्य रेल्वेवर रोज १८१० लोकल ट्रेनच्या फेऱ्या चालवल्या जातात. त्यामधून ४० लाख प्रवासी प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे ट्रेनच्या दरवाजातून रोज लटकून प्रवास करतात. त्यामुळे रोज १० ते १२ जण ट्रेनमधून पडून मृत्युमुखी पडतात. रोज होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वेने एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. एसी लोकलचे दरवाजे बंद असल्याने ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लटकण्याची संधी मिळणार नाही, तसेच त्यामुळे अपघात रोखून मृत्यू होणारी संख्या कमी करता येईल या हेतून एसी लोकल सुरु करण्यात आली.


प्रवाशांचा चांगला प्रतिसाद:सीएसएमटी ते ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि टिटवाळा दरम्यान चार एसी लोकलच्या माध्यमातून रोज ५६ फेऱ्या चालवल्या जातात. त्यामधून रोज पन्नास हजाराहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फेब्रुवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत एसी लोकलच्या १८ हजार ७१० फेऱ्या चालवण्यात आल्या आहेत. त्यामधून १ कोटी २९ लाख ५६६ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून रेल्वेला ५८ कोटी १४ लाख ७९ रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.



तिकीट दर कमी केल्याने प्रवासी वाढले:एसी रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाने ५ मे २०२२ पासून एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केली. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढू लागली. तिकीट दर कमी करण्यापूर्वी दिवसाला १९ हजार प्रवासी प्रवास करत होते. यात वाढ होऊन ५० हजाराच्या वर गेली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये एसी लोकलच्या माध्यमातून २५ लाख ३५ हजार ३७४ इतका महसूल मिळाला होता. त्यात वाढ होऊन फेब्रुवारी २०२३ मध्ये ५ कोटी ३० लाख २४ हजार २० रुपये इतका महसूल मिळाला आहे. त्याचवेळी एसी लोकल मधून चुकीचे तिकीट आणि विना तिकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. मध्य रेल्वेवर १ एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत २५ हजारे ७८१ तर पश्चिम रेल्वेवर ३१ हजार ५०० अशा एकूण ५७ हजार प्रवाशांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.



पास, रिटर्न तिकीट दर कमी करावे : एसी लोकलचे भाडे कमी करावे अशी मागणी रेल यात्री परिषद आणि आणि इतर प्रवासी संघटनांनी केली होती. रेल्वे प्रशासनाने त्यावर सकारात्मक निर्णय घेतला. तिकिटाचे दर अर्धे केले. यामुळे १३ महिन्यात १ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. ५८ कोटी रुपये महसूल मिळालेला आहे. प्रवाशांना चांगली सुविधा द्यावी. अशी आमची मागणी पहिल्यापासून आहे. एसी लोकलच्या रिटर्न तिकीट, पासच्या दरात सुद्धा कपात करावी, एसी लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी आहे. असे केल्याने जास्तीत जास्त प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करू शकतील अशी प्रतिक्रिया रेल यात्री परिषदचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी दिली.


हेही वाचा: Old Film Songs In Mumbai Local मुंबई लोकलमध्ये जुन्या चित्रपट गीतांची सुरेल मैफिल विजय आशर यांच्या मधुर आवाजाने प्रवासी मंत्रमुग्ध

ABOUT THE AUTHOR

...view details