महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ABVP Agitation Mumbai University : 'विद्यार्थी वसतिगृह सुरू करा' अभाविपचे मुंबई विद्यापीठ कॅम्पसमध्ये आंदोलन - अभाविप मुंबई विद्यापीठ

राज्य सरकारने निर्बंध स्थिर केले असून आता सर्व महाविद्यालय व वसतीगृह सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने ( State Government on College reopening ) दिले आहेत. त्याप्रमाणे महाविद्यालय सुरुही झाले आहेत. मात्र, अजूनही मुंबई विद्यापीठाने विद्यापीठाच्या ( Mumbai University )अंतर्गत येणारे वसतीगृह सुरू केले नाहीत. म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगरने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये आंदोलन केले. ( ABVP Agitation Mumbai University Fort Campus )

abvp agitation at mumbai university
अभाविपचे मुंबई विद्यापीठ कॅम्पसमध्ये आंदोलन

By

Published : Feb 11, 2022, 3:57 PM IST

Updated : Feb 11, 2022, 5:44 PM IST

मुंबई : कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन झाल्यापासून सर्व महाविद्यालय व वसतीगृह बंद करण्यात आले होते. ( College hostels close over corona pandemic ) राज्य सरकारने निर्बंध स्थिर केले असून आता सर्व महाविद्यालय व वसतीगृह सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने ( State Government on College reopening ) दिले आहेत. त्याप्रमाणे महाविद्यालय सुरुही झाले आहेत. मात्र, अजूनही मुंबई विद्यापीठाने विद्यापीठाच्या ( Mumbai University )अंतर्गत येणारे वसतीगृह सुरू केले नाहीत. म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगरने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये आंदोलन केले. ( ABVP Agitation Mumbai University Fort Campus )

आंदोलकाची प्रतिक्रिया

मागणी मान्य -

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव पुराणिक यांनी अभाविपच्या सर्व मागण्या मान्य करून त्वरित आजच वसतीगृह संदर्भात जीआर काढण्याचे आश्वासन दिले व बाकी सर्व मागण्यांवर लवकरात लवकर मुंबई विद्यापीठाकडून निर्णय घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

आज विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाने फोर्ट कॅम्पसमध्ये आंदोलन केलं. यामध्ये हॉस्टेल लवकरात लवकर चालू झाले पाहिजे. गेल्या तीन महिन्यांपासून परिषदेने वेगवेगळ्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन, ही आमची मागणी मान्य नाही केली. म्हणूनच परिषदेने आंदोलन केलं. यानंतर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या. कुलसचिव पुराणिक यांना सूरज लोकरे प्रांत सहमंत्री यांनी विद्यापीठाला इशारा दिला की येणाऱ्या काळात कसल्याही विद्यार्थ्याना त्रास झाला तर परिषद अजून तीव्र स्वरुपात होईल.

हेही वाचा -Bachchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगर मंत्री सुश्री गौतमी अहिरराव म्हणाल्या, 'मुंबई विद्यापीठाला वारंवार सांगून सुद्धा वसतीगृह सुरू केले नाहीत. आज अभाविपच्या वतीने आंदोलन करून वसतीगृह सुरू केले पाहिजे व अन्य काही मागण्या कुलसचिव पुराणिक यांना भेटून सांगितल्या व त्यांनी आश्वासन दिले की त्वरित वसतीगृह सुरू करू व बाकीच्या विषयावर लवकरच तोडगा काढू."

Last Updated : Feb 11, 2022, 5:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details