महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : मुलीला पळवून नेऊन केला अत्याचार; कुटुंबियांना जीवे मारण्याची दिली धमकी - Abusing girl by kidnap her

मुंबईच्या ना.म.जोशी मार्ग परिसरात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्ती पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. तसेच तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Mumbai Crime
मुलीला पळवून नेऊन केला अत्याचार

By

Published : Feb 5, 2023, 7:53 PM IST

मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या ना.म.जोशी मार्ग परिसरात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्ती पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. तसेच तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात कलम भारतीय दंड संविधान कलम 376(ड), 506, 34 आणि पॉक्सो कलम 4,8,17 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पश्चिम रेल्वेच्या रुळालगत असलेल्या निर्जनस्थळी मुलीवर आरोपीने अत्याचार केला. पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. आरोपीच्या मित्राने बुधवारी पीडित मुलगी घरी असताना आरोपीने बोलाविले असल्याचा निरोप दिला होता. मात्र, तरीदेखील पीडित मुलगी येत नसल्याने आरोपी आणि त्याच्या मित्राने मुलीला जबरदस्तीने मुलीला रेल्वे रुळालगत असलेल्या निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केले.

जीवे मारण्याची धमकी : संबंधित घटनेत मुलीने आरडा ओरडा करून अत्याचारास विरोध केला. त्यावेळी आरोपी नराधमांनी तिला बेदम मारहाण केली आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या कुटुंबियांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती कुणाला सांगितल्यास बदनामी केली जाईल अशी धमकी दिली. या धक्कादायक घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने घरातल्यांना दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अत्याचार रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस करत आहेत.



अलीकडेच घडला सामूहिक बलात्काराचा गुन्हा : मध्य मुंबईतील लोअर परेल भागात एका 16 वर्षीय मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार आरोप केल्याप्रकरणी ना म जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक होती केली असून रात्री चाळीत घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत सहभागी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले होते. यामध्ये मुलीच्या बॉयफ्रेंडसह अन्य सहा मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.

हेही वाचा :UP Crime News : बलात्कार करायला आलेल्या नराधमाच्या ओठाचा लचकाच तोडला, पाकिटात टाकून दिला पोलिसांकडे

ABOUT THE AUTHOR

...view details