महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अ‌ॅक्शन'वर रिअ‌ॅक्शन होतातंच; आक्षेपार्ह टिकटॅाक प्रकरणी अबू आझमींची प्रतिक्रिया

टिकटॉकवर मॉब लिचींगमध्ये मृत पावलेल्या तबरेजबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याने मुंबई पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी झारखंडमध्ये झालेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत व्हिडिओ अपलोड केला होता.

ऍकॅशन वर रीऍकॅशन हे होतातच;आक्षेपार्ह टिकटॅाक प्रकरणी अबू आझमीची प्रतिक्रीया

By

Published : Jul 10, 2019, 1:58 PM IST


मुंबई- तरुणाईत सध्या टिकटॅाकची क्रेझ आहे. मात्र आक्षेपार्ह टिकटॅाक व्हिडिओ बनवणाऱ्या मुलांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुलांना अटक करण्यापूर्वी तबरेजचा व्हिडिओ पोलिसांनी पाहावा. त्यामुळेच हा व्हिडिओ त्या मुलांनी बनवला असेल हे लक्षात घ्यावे आणि ज्याला कोणाला आपल्या धर्माबद्दल बोलायचे असेल त्यांनी घरी बोलावे, सार्वजनिक जागेत बोलू नये, असे मत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी व्यक्त केले आहे.

टिकटॅाक प्रकरणी अबू आझमीची प्रतिक्रीया


'अ‌ॅक्शन'वर रिअ‌ॅक्शन नेहमी होत राहतात. त्या सहन कराव्यात. मात्र अ‌ॅक्शन म्हणजे तबरेज सारख्या वाईट घटना घडत असतील आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर लोकं त्यावर रिअॅक्शन देतातच म्हणून सरकारने तरबेज सारख्या घटना होऊ नये याकडे लक्ष द्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण-

टिकटॉकवर मॉब लिचींगमध्ये मृत पावलेल्या तबरेजबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याने मुंबई पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी झारखंडमध्ये झालेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत व्हिडिओ अपलोड केला होता. त्यावर शिवसेनेचे पदाधिकारी रमेश सोळंकी यांनी व्हिडिओ आक्षेपार्ह आहे, अशी तक्रारी केली होती. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांना अटक केली. यात फैजल शेख, हसनैन खान, अदनान शेख, फैज बलोच, साधन फारुकी या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details