महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : पोलीस बनले डिलिव्हीर बॉय अन् फरार आरोपीला केले जेरबंद - आरोपीवर आतापर्यंत 26 गुन्हे नोंदवले

Mumbai Crime: अनेक गुन्ह्यात तो फरार होता. अनेक गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी पोपट जाधव उर्फ बचकाना जामिनावर बाहेर आल्यानंतर फरार होता. तो सध्या रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी डिलिव्हरी बॉयचा वेश करून सतत 3 दिवस आरोपीचा पाठलाग करून हाच आरोपी असल्याची खात्री होताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime

By

Published : Dec 11, 2022, 4:41 PM IST

पोलिसांनी डिलिव्हरी बॉय बनवून पकडले

मुंबई: मुंबईच्या एमएचबी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी डिलिव्हरी बॉय म्हणून सतत 3 दिवस आरोपीचा पाठलाग करून आरोपीला अखेर ताब्यात घेतलं आहे. Mumbai Police अजय उल्हास पोपट जाधव (२९ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. MHB police आरोपीवर आतापर्यंत 26 गुन्हे नोंदवले असून तो सध्या जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हे करू लागला होता.

अनेक गुन्ह्यात तो फरार होता. अनेक गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी पोपट जाधव उर्फ बचकाना जामिनावर बाहेर आल्यानंतर फरार होता. तो सध्या रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी डिलिव्हरी बॉयचा वेश करून सतत 3 दिवस आरोपीचा पाठलाग करून हाच आरोपी असल्याची खात्री होताच, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details