महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्क्कादायक! वैवाहिक आयुष्याशी निगडित समस्यांमुळे ६६.५८ टक्के महिलांचे मृत्यू, के ई एम रुग्णालयाचा अहवाल - महिला मृत्यू केईएम अहवाल

महिलांवर घरगुती हिंसाचार होतो. यात अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतो. मुंबईत होणाऱ्या महिलांच्या मृत्यू पैकी ५७.३ टक्के मृत्यू हे अनैसर्गिक कारणांमुळे तर ६६.५८ टक्के महिलांचे मृत्यू वैवाहिक आयुष्याशी निगडित समस्यांमुळे होत असल्याचे उघड झाले आहे. कौंटुबिक कारणांमुळे महिलांवर होणाऱ्या हिंसेचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अभ्यासातून दिसून येते.

के ई एम रुग्णालयाचा अहवाल
KEM Hospital report

By

Published : Mar 14, 2023, 9:22 AM IST

मुंबई - महिलांच्या मृत्यू मागील सामाजिक कारणांची सातत्याने चर्चा होते. त्यात वैद्यकीय विश्लेषणही महत्त्वाचे असते. यासाठी के ई एम रुग्णालयाने रुग्णालयात आलेल्या वैद्यकीय कायदेविषयक प्रकरणांचा अभ्यास केला आहे. २० ते ३१ मे २०२३ या कालावधीमधील ६१९० प्रकरणे रुग्णालयात नोंद झाली. रुग्णालयात करण्यात आलेल्या १४६७ शवविच्छेदन अहवालांपैकी ८४० म्हणजे ५७.३ टक्के महिलांचा अनैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. पिडितेने नातेवाईकांनी दिलेली माहिती, पोलिसांनी तयार केलेली चार्जशीट, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, अहवालाची मदत अभ्यास करताना घेण्यात आली.


असे होतात महिलांचे मृत्यू -हिंसाचाराच्या १८१ प्रकरणामधील ६७ टक्के महिला विवाहित होत्या. ५३.२९ टक्के महिला अविवाहित होत्या तर ७.४ टक्के महिला घटस्फोटित किंवा पतीपासून विभक्त झाल्या होत्या. ५८ महिलांचा मृत्यू जळल्यामुळे झाला होता तर २० टक्के महिला गळफास, १६ टक्के महिलांनी विषप्राशन केले होते. ३ टक्के महिला उंचावरून पडल्या होत्या. ६ टक्के महिलांना गंभीर स्वरुपाची मारहाण झाली होती. औषधे, केमिकल्सचा वापर करून ३८ टक्के मृत्यू झाले होते. धूर, आग यामुळे ३५ टक्के मृत्यू झाले. २४ टक्के मृत्यू हे शस्त्राचा वापर न करता केलेल्या हल्ल्यामुळे झाले होते. ११४ पैकी ६९ प्रकरणांमध्ये पती किंवा जोडीदार महिलेच्या मृत्यूसाठी कारणीभूत होता. ३५ टक्के प्रकरणामध्ये कुटुंबातील इतर सदस्य हे मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.


६६.५८ टक्के मृत्यू वैवाहिक आयुष्यामुळे -६६.५८ टक्के महिलांचे मृत्यू वैवाहिक आयुष्याशी निगडित समस्यांमुळे होतात. ३३.२९ टक्के मृत्यू घरगुती भांडणामुळे, नातेसंबधातील ताणतणाव होतात. १५.१३ टक्के मृत्यू अयशस्वी प्रेमप्रकरणांमुळे होतात. २१ टक्के महिलांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. गळफास किंवा उंचावरून उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी एक दिवसापेक्षा कमी होता. गंभीर रित्या मारहाण तसेच हल्ला झालेल्या महिला तीन दिवस, विष पिलेल्या महिला पाच दिवस तर जाळण्यात आलेल्या महिला रुग्ण सहा दिवसापर्यंत मृत्यूशी झुंज देत होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details