मुंबई- अनाथ मुलांच्या सामाजिक संस्थेच्या नावाखाली दिल्लीतील अभिनव अग्रवाल या व्यक्तीला काही वर्षांपूर्वी नऊ दिवसांचे मूल दत्तक देण्यात आले होते. मात्र तब्बल अडीच वर्षानंतर हे दत्तक घेतलेल मुल तस्करीच्या माध्यमातून बेकायदापणे अभिनव अग्रवाल याला विकण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात होता. मात्र अभिनव अग्रवाल यांनी न्यायालयीन लढा देऊन पुन्हा एकदा मुलाचा ताबा मिळवला आहे.
सामाजिक संस्थेच्या नावाखाली मूल दत्तक देऊन घेतले लाखो रुपये
काही वर्षांपूर्वी अभिनव अग्रवाल हे त्यांच्या बहिणीसोबत एका रुग्णालयांमध्ये गेले असता, त्याठिकाणी एक व्यक्ती त्यांना भेटला होता. त्याने तो एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांने त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्या व्यक्तीने त्याच्याकडे दत्तक देण्यासाठी काही मुले असल्याचेही सांगितले होतं. सुरुवातीला दत्तक मूल घेण्यामध्ये रुची न दाखवणाऱ्या अभिनव अग्रवाल यांनी नंतर नऊ दिवसांचे एक मूल दत्तक घेतले होते. या साठी काही लाख रुपये या सामाजिक संस्थेला अभिनव अग्रवाल यांनी दिले होते.
मुल दत्तक घेतल्यानंतर त्याच्या मुलाच्या पालन-पोषणाकडे अग्रवाल हे मन लावून लक्ष देत होते. मात्र अचानक ऑक्टोबर 2019 या महिन्यांमध्ये मुंबई पोलिसांकडून त्यांना नोटीस आली, या नोटीसीतून त्यांना मुंबईत त्यांनी घेतलेल्या दत्तक मुलांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल-
अभिनव अग्रवाल यांनी मिळालेल्या नोटीसनुसार मुंबई पोलिसांसमोर ते हजर झालेले असता, त्यावेळी त्यांनी दत्तक घेतलेले मूल हे तस्करीचे असल्याचे समजले. तसेच या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला होता. यानंतर अभिनव अग्रवाल यांनी दिवाणी न्यायालयमध्ये या संदर्भात दाद मागितली होती. आपली फसवणूक झाली जरी असली तरी या मुलांचे पालनपोषण आपण मन लावून करत होतो, म्हणून त्याची कस्टडी आपल्याला मिळावी, अशी याचिका त्यांनी दाखल केली होती.