मुंबई - नाशिक महानगरपालिकेत महापौरपदासाठी महाशिवआघाडी व भाजपने अर्ज दाखल केला आहे. मात्र, दोघांकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे दोन्ही पक्षांनी मनसेला पाठिंबा देण्यासाठी साकडे घातले आहे. तर, याबाबत मनसेच्या नगरसेवकांनी मंगळवारी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून आज संध्याकाळपर्यंत ते व्हिप जाहीर करणार असल्याची माहिती आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे राज्यासारखी स्थिती नाशिकमध्ये होऊ नये यासाठी मनसेच्या 7 नगरसेवकांनी आज(मंगळवार) कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर आज संध्याकाळी राज ठाकरे मनसेकडून व्हिप जाहीर करणार असल्याचे मनसे नेते अभिजित पानसे यांनी सांगितले.