महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'10 रुपयात थाळी म्हणजे जागा लाटण्याची नवी योजना' - शिवसेनेच्या १० रु थाळीबाबत अभिजित बिचुकले

दहा रुपये थाळीबिळी असलं काही नाही. मी लोकांच्याच घरी जेवायला जाणार आहे. लोक श्रीमंत आहेत. १० रुपयांची थाळी लावून त्यांना भिकारी समजता का? येथील भिकारी सुद्धा कोट्यधीश आहे. त्याला सुद्धा १० रुपयांच्या थाळीची गरज नाही, असा टोला बिचुकले यांनी शिवसेनेला लगावला.

अभिजित बिचुकले

By

Published : Oct 19, 2019, 3:23 PM IST

मुंबई - शिवसेनेने झुणका भाकर योजना सुरू केली होती. त्या योजनेसाठी जागा देण्यात आली. आज त्या योजना बंद झाल्या आहेत. मात्र, त्यासाठी दिलेली जागा कुठे आहेत? असा प्रश्न अभिजित बिचुकले यांनी केले. तसेच शिवसेनेची १० रुपयांत जेवणाची थाळी म्हणजे जागा लाटण्याची नवी योजना आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास करून आणखी अब्जाधीश बनण्याचा यांचा डाव आहे, असे गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. वरळी विधानसभा मतदार संघात अभिजित बिचुकले यांनी मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

'10 रुपयांच्या थाळी म्हणजे जागा लाटण्याची नवी योजना'

माझे घर मुंबईत असो कि नसो, निवडणुकीच्या विजयानंतर रोज सायंकाळचे जेवण मी वरळीकरांबरोबर त्यांच्या घरीच करेन. विजयानंतर विरोधकांनीही मला त्यांच्या घरी बोलवले, तरी त्यांच्या घरी सुद्धा जेवायला जाईल. त्यावेळी तेथील यंत्रणांशी बोलून त्यांचे प्रश्न सोडवेल. १० रुपये थाळीबिळी असलं काही नाही. मी लोकांच्याच घरी जेवायला जाणार आहे. लोक श्रीमंत आहेत. १० रुपयांची थाळी लावून त्यांना भिकारी समजता का? येथील भिकारी सुद्धा कोट्यधीश आहे. त्याला सुद्धा १० रुपयांच्या थाळीची गरज नाही, असा टोला बिचुकले यांनी शिवसेनेला लगावला.

साध्या कचऱ्याकुंड्या साफ करता येत नाही, तर पुढे हे काय दिवे लावणार? -
माझ्याकडे नाव, प्रसिद्धी आहे. मात्र, त्यांच्यासारखा माझ्याकडे जनतेचा पैसे नाहीत. आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका यांच्याकडे आहे. यामुळे त्यांचे प्रचार मोठे चालले आहेत. मी पायाने फिरतो आहे. त्यामुळे माझे वजन २ ते ४ किलो घटले आहे. कलाकार होण्याची संधी मला आहे. मात्र, सर्व समाजाच्या हितासाठी मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचारासाठी लोकांच्या गाठीभेटी घेत आहे. या लोकांनी काहीही केलेले नाही, असे मला लोक सांगत असल्याचे ते म्हणाले.

वरळी कोळीवाडा तर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे. गेली ५ वर्ष मी कोणाला बोलायची संधीच देणार नाही, असे मी वरळीकरांना आश्वासन दिल्याचे बिचुकले म्हणाले. लोकांचे प्रश्न आहेत तसेच आहेत. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे आहे. या लोकांना साध्या कचऱ्याकुंड्या साफ करता येत नाही, तर पुढे हे काय दिवे लावणार? असा प्रश्न बिचुकले यांनी उपस्थित केला.

...तर तो ईव्हीएम घोटाळा असेल -
शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना सव्वा लाख मते मिळण्याचा दावा केला जात आहे. याबाबत बोलताना असा दावा केला जात असेल, तर हा ईव्हीएममधील सर्वात मोठा घोटाळा असेल. आदित्य आता बाळ आहे. त्याला सव्वा लाख मते द्यायला मुंबईकर वेडे आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत यांच्या परिवाराने शिवाजी महाराजांच्या नावाने लोकांना गंडवले आहे, असा आरोप बिचुकले यांनी केला. हे सव्वा लाख कसे सांगू शकतात? सुप्रसिद्ध नट गोविंदाही त्याला कधी किती मते मिळणार? असे बोलला नव्हता, असे बिचुकले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details