महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मी राजीनामा देणार नाही, कुणीतरी अफवा पसरवली' - अब्दुल सत्तार राजीनामा न्यूज

कुणीतरी माझ्या राजीनाम्याची अफवा पसरवली होती. मी राजीनामा दिलेला नाही, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

मी राजीनामा देणार नाही
मी राजीनामा देणार नाही

By

Published : Jan 5, 2020, 2:12 PM IST

मुंबई - मी राजीनामा दिलेला नाही आणि देण्याचा विचारही नाही. कुणीतरी माझ्या राजीनाम्याची अफवा पसरवली, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अब्दुल सत्तार यांना महसूल व ग्रामविकास खाते देण्यात आले आहे.

मी राजीनामा देणार नाही, अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले


मला मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन. माझ्या मनात काही शंका होत्या, त्या मी ठाकरे साहेबांकडे मांडल्या आहेत. यावर तेच पुढील कारवाई करतील, असे सत्तार म्हणाले.

हेही वाचा - अखेर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर !

शनिवारी अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्यांना काही अडचणी होत्या, त्यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना नेत्यांनी सत्तार यांची भेटही घेतली होती, असे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details