महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Abdul Sattar : सुप्रिया सुळेंवरील वादग्रस्त विधान; मंत्री सत्तारांचे निवासस्थान फोडले - मंत्री अब्दुल सत्तार शासकीय निवासस्थानी आंदोलन

ज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar Controversial statement ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे ( MP supriya sule) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या विरोधात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. अब्दुल सत्तार याच्या मंत्रायलासमोरील असलेल्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलन काळात परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 7, 2022, 5:14 PM IST

Updated : Nov 7, 2022, 7:00 PM IST

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar Controversial statement ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे ( MP supriya sule) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या विरोधात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. अब्दुल सत्तार याच्या मंत्रायलासमोरील असलेल्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलन काळात परिसरात तणाव निर्माण झाला होता.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना कार्यकर्ते...

मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नाहीत -आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्र बघितलेला आहे. महिलांचा अपमान सहन करणार नाही. अब्दूल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. त्यांना अशाप्रकारची विधान करताना लाज वाटली नाही का?”, असा घणाघात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चढवला. परंतु,सत्तार जोपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या बंगल्याबाहेरुन हटणार नाहीत, असा पवित्रा चव्हाण यांनी यावेळी घेतला. तसेच मुख्यमंत्र्यांना ही मंत्रालयात बसू देणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.


अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्‍या मंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे. विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशात आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा तीव्र निषेध महेश तपासे यांनी केला आहे.

अन्यथा राष्ट्रवादीच्या रोषाला सामोरे जावे लागेल - खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कृषी मंत्र्यांच्या राजीनामाची मागणी केली.

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिली. सत्तार यांच्या शिवराळ भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर तीव्र आंदोलन केले. दरम्यान, सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सत्तारांच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी शासकीय बंगल्याला घेराव घालत, काचा फोडल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांची धरपकड केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी चांगलेच आक्रमक झाले होते.

Last Updated : Nov 7, 2022, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details