महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जानेवारी 2021मध्ये तब्बल 95 अल्पवयीन मुलींचे अपहरण

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरात टाळेबंदीत सुट देण्यात आल्यानंतर मुंबई शहरात गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जानेवारी 2021 या महिन्यात मुंबईत तब्बल 3 हजार 140 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Feb 20, 2021, 10:29 PM IST

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरात टाळेबंदीत सुट देण्यात आल्यानंतर मुंबई शहरात गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जानेवारी 2021 या महिन्यात मुंबईत तब्बल 3 हजार 140 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 3 हजार 140 गुन्ह्यांमध्ये केवळ 50 टक्के गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई शहरात जानेवारी या महिन्यात 95 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून 42 अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे गुन्हे घडले आहे.

जानेवारी 2021मध्ये तब्बल 95 अल्पवयीन मुलींचे अप

मुंबईत घडलेले विविध गुन्हे

जानेवारी, 2021 मध्ये मुंबई शहरात तब्बल 12 खून झाले असून खुनाच्या प्रयत्नाचे 36 गुन्हे मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले आहेत. याबरोबरच दरोड्याचे 89 गुन्हे घडले असून खंडणीची 31 गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. मुंबई शहरात जानेवारी 2021 मध्ये वाहन चोरीचे 325 गुन्हे घडले असून जखमी करण्याचे 341 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलीचे 30 गुन्हे नोंदविण्यात आले असून बलात्काराचे तब्बल 75 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर इतर प्रकरणांमध्ये 1 हजार 443 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

अल्पवयीन मुलींवर बलात्कार व अपहरणाच्या गुन्ह्यात वाढ

शहरात जानेवारी 2021 मध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याचे 42 गुन्हे नोंदविण्यात आले असून महिलांवर झालेल्या बलात्काराचे 36 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई शहरात तब्बल 95 अल्पवयीन मुलींचे अपहरण जानेवारी महिन्यामध्ये घडले असून त्याबाबत गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतर आतापर्यंत 45 अल्पवयीन मुलींचा शोध पोलिसांनी घेतला आहे.

मुंबईत जानेवारी महिन्यात 2 महिलांचा खून घडला असून 6 महिलांनी आत्महत्या केल्या आहे. महिलांवरील अत्याचाराचे तब्बल 461 गुन्हे जानेवारी 2021 मध्ये नोंदविण्यात आले असून यामध्ये 266 प्रकरणात पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केलेली आहे.

हेही वाचा -कुख्यात गुंड रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांकडे

ABOUT THE AUTHOR

...view details