महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Children Kidnapping Racket : भीक मागण्यासाठी मुले पळवून नेणारी टोळी सक्रीय; मोठे रॅकेट पोलिसांनी केले उघड

फुटपाथवरील लहान मुलांना हेरून (children kidnapping from Footpath) त्यांचा भीक मागण्यासाठी (abducting children for begging)  वापर करण्याकरिता अपहरण करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश ( police bust children kidnapping racket) केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक महिला आरोपी फरार आहे. केवळ भीक मागण्यासाठी या मुलांचे अपहरण करण्यात आले होते की अजून काही उद्देश या मागे होता याबद्दल तपास सुरू आहे. (Children Kidnapping Racket )

Children Kidnapping Racket
अपहरण झालेल्या बालकांची सुटका

By

Published : Dec 16, 2022, 8:17 PM IST

अटक करण्यात आलेल्या आरोपींविषयी माहिती देताना पोलीस

मुंबई : भीक मागण्यासाठी मुलांचे अपहरण (abducting children for begging) करणाऱ्या एका टोळीला कांजूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कांजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांजुर रेल्वे स्थानक फुटपाथवर राहणाऱ्या वर्षा कांबळे हिचा पाच वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी या दोघांचे अपहरण (children kidnapping from Footpath) करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुण्याहून मुंबईकडे येताना ट्रेनमध्ये वर्षाची काळे कुटुंबीयांशी ओळख झाली होती आणि त्यांनीच आपल्या मुलांचे अपहरण केले असल्याचे तिने पोलिसांना सांगितलं. याचा शोध पोलिसांनी घेतला असता या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश (police bust children kidnapping racket) झाला आहे. (Children Kidnapping Racket )

भीक मागण्यासाठी मुलांचे अपहरण:त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर काळे कुटुंबीयांचा ठाणे, कोल्हापूर, सांगली, नगर, औरंगाबाद या शहरात शोध घेऊन पाठलाग केला. यांच्यातील मुख्य आरोपी हर्षद काळे याच्यासोबत ताराबाई काळे, चंदू काळे या दोघांना ताब्यात घेतलं. हर्षद याची बायको पौर्णिमा काळे ही सध्या फरार आहे. वर्षा यांच्या दोन मुलांची सुखरूप सुटका आरोपींकडून पोलिसांनी केली आहे. पोलीस चौकशीत या दोन मुलांचे अपहरण भीक मागण्यासाठी केले असल्याचे प्राथमिक दृष्ट्यासमोर आले आहे. मात्र, त्यानंतर पुढे या मुलांचे हे आरोपी काय करायचे आणि आतापर्यंत अशी किती मुले त्यांनी अपहरण केली आहेत, याचा तपास सध्या कांजूर पोलीस करत आहेत. या दोन मुलांची सुटका करण्यासाठी तब्बल ११ दिवस पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला आणि अखेर त्यांची सुटका करून दोन्ही मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.


पोलीस पथकांची नेमणूक :पोलीस उपायुक्त पुरषोत्तम कराड यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, कांजूर मार्ग रेल्वे स्थानकाच्या बाहेरुन या दोन मुलांचे अपहरण करण्यात आले. आरोपींनी तीन ते चार दिवस या मुलांवर नजर ठेवली होती आणि त्यानंतर अपहरण करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी याच्या तपासासाठी पाच पोलिसांची पथके तयार केली. त्यानंतर ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी या टीम पाठवल्या. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक महिला आरोपी फरार आहे. केवळ भीक मागण्यासाठी या मुलांचे अपहरण करण्यात आले होते की अजून काही उद्देश या मागे होता याबद्दल तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details