महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सारथीच्या सक्षमीकरण जीआरचे आबासाहेब पाटलांनी केलं स्वागत

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला (सारथी) अधिक सक्षम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठीचा जीआर आज काढण्यात आला आहे. जीआर आल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख समन्वयक आबासाहेब पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Abasaheb patil
सारथीच्या सक्षमीकरण जीआरचे आबासाहेब पाटलांनी केलं स्वागत

By

Published : Jan 9, 2020, 8:40 PM IST

Updated : Jan 9, 2020, 11:43 PM IST

मुंबई -छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला (सारथी) अधिक सक्षम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठीचा जीआर आज(गुरुवारी) काढण्यात आला आहे. जीआर आल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख समन्वयक आबासाहेब पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असल्याने त्याचा राज्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थी आणि तरुणांना लाभ मिळणार आहे. आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, फेलोशिफ सुरू आहे, ती यापुढेही कायम सुरू राहणार आहे. आज काढलेल्या परिपत्रकामुळे सारथी संस्थेवर शासकीय अधिकारी, मंत्री, आमदार व मराठा समाजातील उच्च शिक्षीत वरिष्ठांची उप समिती नेमली जाणार आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत असल्याचेही आबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सारथीच्या सक्षमीकरण जीआरचे आबासाहेब पाटलांनी केलं स्वागत

मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर सारथी होणारी सहायत्ता कायम राहणार असल्याचे पाटील म्हणाले. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची काळजी सरकारने घेतली आहे. विद्यार्थ्यांनी फेलोशिप, शिष्यवृत्ती मिळणार आहे. सारथीवरती शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाल्याचे आबासाहेब पाटील म्हणाले.

Last Updated : Jan 9, 2020, 11:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details