मुंबई - येथील सायन स्टेशनच्या बाहेरच्या परिसरात शनिवारी सकाळी एक संशयास्पद बॅग आढळून आली. ही बॅग बराच वेळ तिथे बेवारसपणे पडून असल्याने नागरिकांनी पोलिसांना संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने सदर बॅग तपासून ताब्यात घेतली.
मुंबईतील सायन स्टेशनच्या बाहेर संशयास्पद बॅग आढळल्याने भीतीचे वातावरण - abandoned bag found near sion station news
मुंबईतील सायन स्टेशनच्या बाहेरच्या परिसरात एक संशयास्पद बॅग आढळल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी डॉग स्कॉडसह घटनास्ठळी पोहचून बॅग ताब्यात घेतली.
सायन स्टेशनबाहेर आढळली संशयास्पद बॅग
शनिवारी सकाळी सायन स्टेशन अवर लेडी शाळेसमोर एक बेवारस संशयास्पद बॅग आढळली. ती खूप वेळापर्यंत तशीच पडून असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही नागरिकांनी पोलिसांना संपर्क करून याबाबत माहिती दिला. सदर माहिती मिळताच पोलीस डॉग स्कॉडसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॅगची तपासणी केली व तिला ताब्यात घेतले.