महाराष्ट्र

maharashtra

आरेत दुसऱ्या दिवशीही परिस्थिती जैसे थे...

By

Published : Oct 6, 2019, 1:42 PM IST

Updated : Oct 6, 2019, 2:41 PM IST

आरेतील मेट्रो कारशेडसाठी शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी याठिकाणी जमा झाले.या आंदोलनाचे पडसाद शनिवारी सकाळपासून दिसायला लागले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शनिवारी ताब्यात घेतले. आज(रविवार) तिसऱ्या दिवशीही आरेतील परिस्थिती जैसे थेच आहे.

आरे

मुंबई - आरेतील मेट्रो कारशेडसाठी शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी याठिकाणी जमा झाले. स्थानिकांसह पर्यावरणवादी संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाचे पडसाद शनिवारी सकाळपासून दिसायला लागले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शनिवारी ताब्यात घेतले. आज(रविवार) तिसऱ्या दिवशीही आरेतील परिस्थिती जैसे थेच आहे.

आरेसाठी आंदोलन सुरूच

आरेत प्रवेश करणाऱ्या तिन्ही मार्गावर मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. आरे चेक नाका येथे स्थानिक नागरिकांचे ओळखपत्र तपासून त्यांना आत सोडलं जातंय. आजही आरे परिसरात 144 कलम लागू आहे. आत्तापर्यंत 2000 झाडे तोडण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. जोपर्यंत झाडे पूर्ण तोडून होत नाही तोपर्यंत आरेत पोलीस बंदोबस्त असाच असणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - आरे वृक्षतोडीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकारच

Last Updated : Oct 6, 2019, 2:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details