महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवईतील आरे कॉलनी रस्ता बंद; मिठी नदीचे पाणी रस्त्यावर

मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पवईतील विहीर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीचे पाणी पवई-आरे कॉलनी रस्त्यावर आले आहे. परिणामी, हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 4, 2019, 3:19 PM IST

मुंबई - मुसळधार पावसामुळे पवई तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शिवाय विहार तलाव ओव्हरफ्लो झाल्याने मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मिठी नदीचे पाणी पवई-आरे कॉलनी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

पवईतील आरे कॉलनी रस्ता बंद

पवईला यायचे असल्यास आरे रोडचा वापर न करता पवई गार्डन रस्त्याचा वापर करावा. तसेच ज्यांना पाश्चिम द्रुतगती मार्गाने जायचे असेल त्यांनी महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईत 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे. रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीलाही याचा फटका बसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details