मुंबई :अवघ्या महाराष्ट्र राज्याच्या 12 कोटी ही जनतेचे लक्ष असलेल्यामुंबई मेट्रोच्या संदर्भातील दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी यांनी केले. मुंबई उपनगर अंधेरीच्या लोकल स्टेशनच्या पूर्वेला दोन किलोमीटर अंतरावर म्हणजेच पश्चिम द्रुतगती मार्गाच्या समांतर या ठिकाणी गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानक आहे. काल त्याचे पंतप्रधान उद्घाटन केले. परंतु या ठिकाणी महत्त्वाची नोंद घेण्याजोगी बाब अशी की, शासकीय कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. मात्र भारतीय जनता पक्षाचे झेंडे या ठिकाणी लावलेले दिसत होते.
दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन : शिंदे फडणवीस शासनाने सत्तांतर झाल्यावर जलद गतीने निर्णय घेतले. हजारो कोटी रुपये खर्च करून एमएमआरडीएने अर्थात मुंबई विकास महानगर प्राधिकरण यांनी मुंबईतील मेट्रोचे जाळे विणण्याचे ठरवले. अखेरीस मेट्रो दोन आणि मेट्रो सात यांच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल गुंदवली रेल्वे स्थानकात सायंकाळी साडेसहा वाजता पार पडले.
भाजपचे चिन्ह असलेले झेंडे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. ते एक शासकीय संवैधानिक पदावर आहेत. त्यामुळे ते हा कार्यक्रम कुठल्याही एका पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर आपल्या संसदेचे सर्वात महत्त्वाचे वरिष्ठ नेते आणि देशाचे महत्त्वाचे नेते म्हणून शासकीय कार्यक्रमाचे त्यांनी उद्घाटन केले. मात्र या ठिकाणी गुंदवली रेल्वे स्थानकाच्या खाली भारतीय जनता पक्षाचे चिन्ह असलेले झेंडे लावलेले दिसत होते.