मुंबई - पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची साक्ष घेण्यात आली आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी पद्मसिंह पाटलांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, एवढेच नाही, तर त्यांनी मझी सुपारीही दिली होती, असे अण्णा हजारे यांनी आपल्या साक्षीत म्हटले आहे.
पद्मसिंह पाटलांनी मला मारण्याची सुपारी दिली होती - अण्णा हजारे - pavanraje nimbalkar
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती. मात्र, पद्मसिंह पाटील हे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे माझ्या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही.
याबद्दलची तक्रार मी देशाच्या पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती, मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील हे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे माझ्या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही, असे अण्णा हजारे यांनी साक्ष देताना सांगितले. या सर्व गोष्टींचा या खटल्याशी काहीही संबंध नाही, असे म्हणत बचाव पक्षाच्या वकिलांनी अण्णांच्या साक्षीवर आक्षेप घेतला आहे.
३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेजवळ पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पद्मसिंह पाटलांनी हत्या करणाऱ्या आरोपीना ३० लाखांची सुपारी दिली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे.