दिल्लीत 'आप'चा मॅजिक नंबर पार, तर मुंबईत कार्यकर्त्यांचा जल्लोष - DELHI ELECTION
दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाला बहुमत मिळत आहे. अशात आपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मिठाई वाटत जल्लोष साजरा करण्यात सुरुवात केली आहे. मुंबईमध्येही आपच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला.
'आप' कार्यकर्त्यांचा मुंबईत जल्लोष
मुंबई- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेत बहुमत मिळवले आहे. या आनंदात आज आप समर्थकांनी मुंबईत आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करत फुगड्याही घातल्या. तसेच महाराष्ट्रातही लवकरच ही जादू दिसेल, अशी आशा व्यक्त केली. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.