महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. पाहा रविवारच्या दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या - pune university

नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. कर्नाटकातील ते १० आमदार सध्या मुंबईत सोफिटेल हॉटेल येथे वास्तव्यास आहेत. हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मिळत आहे. ऑनर किलींगची घटना आंतरजातीय विवाह केला म्हणून पोटच्या मुलीची गोळी झाडून हत्या.. तर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह 5 जणांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.. 'झिरो बजेट' शेतीच्या केवळ घोषणा न करता प्रशिक्षण केंद्रे निर्माण करावी, शेतकऱ्यांची मागणी

नाशिक

By

Published : Jul 7, 2019, 2:23 PM IST

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, शहर जलमय.. 'गोदावरी'च्या पुरात कार गेली वाहून

नाशिक - जिल्ह्यात जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि पेठ या ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी शनिवारी रात्रभर संततधार पाऊस पडत होता. सविस्तर वाचा

कर्नाटकात राजकीय भूकंप; काँग्रेस, जेडीयु आमदारांचे राजीनामे, भाजप सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत

मुंबई- कर्नाटकामधील काँग्रेसच्या ८ तर जेडीयूच्या ३ आमदारांनी राजीनामा दिला आहे. सध्या एकूण १३ आमदारांनी राजीनामा विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांकडे दिला आहे. यातील १० आमदार सध्या मुंबईत सोफिटेल हॉटेल येथे वास्तव्यास आहेत. हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मिळत आहे. त्यानुसार आता कर्नाटकातील सरकार टिकते की पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सविस्तर वाचा

ऑनर किलींग; आंतरजातीय विवाह केला म्हणून पोटच्या मुलीची गोळी झाडून हत्या

नवी दिल्ली - कुटुंबीयाच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे पोटच्या मुलीची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. नोएडा येथील दस्तमपूर येथे ही घटना घडली. निशा पुत्री असे मृत तरुणीचे नाव आहे. सविस्तर वाचा

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह 5 जणांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर यांच्यासह 5 जणांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री कुलगुरूंसह कुलसचिव प्रफुल्ल पवार, सिनेट सदस्य संजय चाकण, सुरक्षा अधिकारी सुरेश भोसले आणि सुरक्षारक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत यांच्यावर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आकाश भीमराव भोसले (वय 25) यांनी तक्रार दाखल केली होती. सविस्तर वाचा

'झिरो बजेट' शेतीच्या केवळ घोषणा न करता प्रशिक्षण केंद्रे निर्माण करावी

अमरावती - देशातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही खर्च शून्य (झिरो बजेट) शेती म्हणजे नेमकी कुठली शेती हे माहीत नाही. याप्रकारची शेती कशी करावी हे माहिती व्हावी, यासाठी शेतकऱ्यांना या प्रकारच्या शेतीचे प्रशिक्षण हे गाव स्तरावर शासनाने निर्माण करावे, अशी मागणी अमरावतीमधील खर्च शून्य नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details