महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. सर्वोच्च न्यायालयाने आरेतील झाडे तोडण्यास केली मनाई - undefined

झरझर नजर.. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर

aaj atta

By

Published : Oct 7, 2019, 12:03 PM IST

Updated : Oct 7, 2019, 2:53 PM IST

  • 12:56 PM : नाशिक- नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे अधिकृत उमेदवार अशोक मुर्तडक यांची निवडणुकीतून माघार...तयारी नव्हती म्हणून मी माघार घेतली, असे अशोक मुर्तडक यांचे म्हणणे आहे...या प्रभातून मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे...

12:57 PM : मुंबई- आरेच्या जंगलात अजूनसुद्धा झाडे तोडली जात असल्याची माहिती.. आरेमध्ये पर्यायवरण प्रेमींना अजूनही मज्जाव केला जातोय..सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी होत नसल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप..आरेत 144 अंतर्गत लागू केलेला जमावबंदीचा कायदा अद्याप लागूच....

  • 12:19 PM : मुंबई- रासपच्या उमेदवारांनी भाजपचे चिन्ह वापरू नये, म्हणून रासपचे अध्यक्ष जानकर यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत...रासप कार्यकर्ते युतीच्या प्रचारात देखील गेलेले नाहीत. त्यामुळे काही निर्णय घेण्यासाठी रासपची बैठक सुरू आहे..राष्ट्रीय समाज पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. बैठक संपल्यानंतर जानकर पत्रकार परिषद घेणार आहेत....राष्ट्रीय समाज पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.

  • 12:22 PM : मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा जनतेच्या संघर्षाचे यश - प्रकाश आंबेडकर
  • 12:28 PM : गोंदिया- गोंदिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार विनोद अग्रवाल यांची मनधरणी करण्यासाठी परिणय फुकेंची गोंदियात चर्चा सुरू.
  • 12:35 PM : पुणे-ब्राह्मण संघटना आणि चंद्रकांत पाटील यांची बैठक काही वेळात सुरु होईल...बैठकीला चंद्रकांत पाटील...मेधा कुलकर्णी आणि सतरा ब्राह्मण संघटना प्रतिनिध हजेरी लावणार...मात्र या बैठकीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ गैरहजर राहणार..बैठकीत परशुराम सेवासंघ विश्वजित देशपांडे आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मयुरेश आरगडे यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर चर्चा होईल.
  • 12:01 AM : नाशिक-नाशिक पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांची माघार...भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात भरला होता अपक्ष उमेदवारी अर्ज..
  • 11:59 AM : कोल्हापूर-ईटीव्ही भारतचा दणका...ऑनलाईन कॅसिनो अड्ड्यावर छापा...मास्टरमाईंड मंगेश कोण याला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान...
  • 12:01 PM : मुंबई-वंचित बहुजन आघाडीच्या आणि इतर जनतेच्या संघर्षाला यश...अनेक संघटना एन.जी.ओ यांच्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी आरे मध्ये आंदोलन केले. आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांचा आधीच्या निकाला विरोधी निकाल मुंबई उच्च न्यायालयाचा आहे. ही बाब प्रकर्षाने आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमात मंडली.
  • 12:01 PM : नाशिक-नाशिक पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांची माघार...भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात भरला होता अपक्ष उमेदवारी अर्ज..
  • 11:12 AM : रत्नागिरी-राजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप बंडखोरांचा तिढा सुटला...भाजपचे बंडखोर संतोष गांगण उमेदवारी अर्ज मागे घेणार...भाजपचे पदाधिकारी आणि सेनेचे उमेदवार राजन साळवींना घेऊन सोडवला तिढा...प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची मध्यस्थी...राजापुरात सेना आणि भाजप घेणार संयुक्त पत्रकार परिषद...
  • 10:58 AM : मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने आरेतील झाडे तोडण्यास मनाई केली.
  • 10:48 AM : भंडारा- मला विनयभंगाच्या खोट्या आरोपात फसविण्याचे षडयंत्र पालकमंत्री परिणय फुके यांनी केले... आमदार चरण वाघमारे यांचा आरोप.
  • Last Updated : Oct 7, 2019, 2:53 PM IST

    For All Latest Updates

    TAGGED:

    aaj atta

    ABOUT THE AUTHOR

    ...view details