महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता...निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षांतरावर कोणीही बोलू नये - खासदार संजय राऊत - todays important news

झरझर नजर...दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

आज...आत्ता...

By

Published : Aug 31, 2019, 9:52 AM IST

Updated : Aug 31, 2019, 3:13 PM IST

  • 2.10 AM : ठाणे- येत्या विधानसभा निवडणुकीत पुढील ८ दिवस उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षांतरावर कोणीही बोलू नये. कोण कुठे जाईल? कोण कुठुन येईल? कोण मधल्यामध्ये लटकेल? याबाबत काही सांगू शकत नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
  • 2.01 AM : हिंगोली - जिल्ह्यातील विविध भागात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजाची काही प्रमाणात चिंता दूर झाली आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढत असून अनेक जण पावसापासून बचाव करण्यासाठी सहारा शोधताना दिसून आले.
  • 1.59 AM : धुळे - पालकमंत्री दादा भुसे यांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जखमींची विचारपूस करून जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे सांगितले.
  • 1.55 AM : धुळे- वाघाडी येथील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
  • 1.54 AM : उस्मानाबाद- राष्ट्रवादीचे राणा पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
  • 1.53 AM : मुंबई -युनायटेड इंडिया या भायखळयामधील बंद मिलच्या जागेवर मुंबई आणि गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारा टेक्सटाईल म्युझियमच्या जागेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. लवकरच हे म्युझियम उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • 1.39 AM : नांदेड- येणाऱ्या विधानसभेत विरोधी पक्षनेता वंचित आघाडीचा असेल, अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
  • 12.50 AM : धुळे - केमिकल कंपनीतील स्फोटामध्ये 15 जाणांचा मृत्यू झाला आहे.
  • 12.42 AM : धुळे - केमिकल कंपनीतील स्फोटामध्ये 13 जाणांचा मृत्यू झाला आहे, तर जखमींची संख्या ४८ वर पोहोचली आहे.
  • 12.06 AM : धुळे - केमिकल कंपनीतील स्फोटामध्ये 10 जाणांचा मृत्यू झाला आहे.
  • 11.00 AM : धुळे - केमिकल कंपनीतील स्फोटामध्ये 8 जाणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जण जखमी झाले आहेत. यांपैकी १८ जण गंभीर जखमी आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
  • 10.38 AM : हिंगोली - गोरेगावला अतिरिक्त तालुका म्हणून घोषीत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत याबाबतची घोषणा केली, तर बाळापूरचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे बाळापूरकर नाराज झाले आहे.
  • 10.35 AM : रायगड- मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्याच्या वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनांची गती मंदावली आहे.
  • 10.17 AM : धुळे -जिल्ह्यातील शिरपूरजवळील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
  • 8.56 AM : यवतमाळ- जिल्ह्यातील उमरखेडमध्ये बँडच्या आवाजाने बैल बिथरला. त्यावेळी बैलाने पोळ्यातच थरार दाखवला.
  • 7.05 AM : परभणी - सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि 17 नगरसेवक यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला.
  • 7.02 AM : परभणी - व्यासपीठ ठरवा, त्यांना उत्तरे धस देतील असे मुख्यमंत्री म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या आव्हानावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोलत होते.
  • 7.15 AM : अमरावती - वाघिणीच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना मेळघाटात घडली आहे.
  • 7.00 AM : मुंबई - वरळी विधानसभेतूनच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव्य अनिल परब यांनी केले.
  • 6.45 AM : जळगाव - भुसावळमध्ये क्षुल्लक कारणावरून एका 36 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विकास साबळे, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे.
Last Updated : Aug 31, 2019, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details