- 5:07 कोल्हापूर - पूरग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विधानसभा निवडणूक पुढे ढकलाव्यात... हा पूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी... पूरबाधित क्षेत्रासाठी राष्ट्रीय आपत्ती कोषातून 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी... अतिवृष्टी, पूरबाधित शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी द्यावी... मृत गाई, म्हैशींसाठी पन्नास हजार रुपये द्यावेत - राजू शेट्टी
- 5:07 अमरावती - राष्ट्र बळकटीकरणासाठी आता 'फिट इंडिया' मोहीम... केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा
- 4:51 गोंदिया - जिल्हा परिषदेसमोर मागील ९ ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेल्या विना अनुदानित शिक्षकांनी शिक्षण विभाग दखल घेत नसल्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात टेबल-खुर्चीची तोडफोड करत केला निषेध.... 20 ते 25 च्या वर महिला पुरुष शिक्षकांना पोलिसांनी घेतल ताब्यात
- 4:47 रायगड - अतिवृष्टीचा फटका जिल्हा परिषदेच्या रस्त्यांनाही... जिल्ह्यातील 1748 रस्ते गेले वाहून.... रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी 70 कोटीचा शासनाकडे प्रस्ताव सादर
- 4:37 अकोला - सशस्त्र हल्ल्यात एकाचा खून; दोन जखमी
- 4:30 भंडारा - पूरग्रस्तांच्या मदतीला पुढे आले विद्यार्थी, गावात रॅली काढत केली देणगी गोळा
- 4:19 जालना - जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाचे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण निर्मल यांच्या दालनातून सहा कोरे धनादेश चोरून त्यापैकी दोन धनादेशावर 33 लाख रुपयांची रक्कम टाकून मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री उत्तम चव्हाण यांची बनावट स्वाक्षरी केली. जिल्हा परिषद कार्यालयाचे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत सदर धनादेश वटवत असताना हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
- 4:00 बी. आर. शेट्टी खंडणी व गोळीबार प्रकरणी छोटा राजनसह 5 आरोपींना 8 वर्षांची कैद..... मकोका न्यायालयाने सुनावली
- २.५४ PM - शासनाची मदत मिळत नसल्याने संतप्त पूरग्रस्तांनी सांगली-इस्लामपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
- २.५१ PM - हिंगोलीमध्ये बाईक चोराने तुरुंगामध्ये फरशीने गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
- २.५१ PM - नाशकात नगर रचना कर्मचाऱ्याला ८० हजार रुपयाची लाच घेतना लाचलुचपत विभागानी रंगेहाथ अटक केली
- २.४९ PM - येत्या 22ऑगस्टला कार्यकर्त्यांना शांतता राखावी. तसेच कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाजवळ जमू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
- १.४० PM - कोल्हापूरच्या महाप्रलयाला पुररेषेबाबत चुकीच्या परवानग्या देणारे मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - सामाजिक आणि पर्यावरण संस्थांची मागणी
- १.२० PM - पती-पत्नीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी जावयाने मेहुणीच्या एक महिन्याच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील पारशिवणी येथील बाखरी (पिपळा) गावात घडली. आज मंगळवारी त्या मुलाच्या नामकरणाचा कार्यक्रम होता. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
- १.११ PM - मनसेकडून 22 तारखेला शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. मात्र, त्यामध्ये शांततापूर्ण वातावरणात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.
- १.०८ PM - कोहिनुर प्रकरणी दुसऱ्या दिवशी मंगळवारी उन्मेष जोशी व राजन शिरोडकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
- १.०६ PM - ठाणे महानगर पालिकेच्या महापौर दालनात मराठा समाजाचे नेते आणि महापौर पदाधिकारी यांच्यात जोरदार वाद झाला. पालिका मुख्यालयात शिवाजी महाराजांचा पुतळा खराब झाल्यामुळे मराठा समाजाचे नेत्यांनी चिल्लर घेऊन दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर महापौरांनी पुतळा दुरुस्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
- १.०४ PM - मुख्यमंत्र्यांनी फुकटचे सल्ले देऊ नये, राज ठाकरेंच्या आदेशानुसार सर्व बंद मागे घेण्यात आले- संदीप देशपांडे
- १.०४ PM - सर्वपक्ष मिळून ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. मात्र, त्यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन मनसेचे बाळा नांदगावकर यांनी केले आहे.
- ११.३७ AM - सरकारने केलेल्या कर्जमाफी वर खुद्द एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे अजित पवार म्हणाले.
- १०.३० AM - भारताचे चांद्रयान २ सकाळी ९.०२ वाजता चंद्राच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले आहे. याबरोबरच इस्रोला मोठे यश मिळाले आहे. १७३८ सेकंदांत शिताफीने हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यात शास्त्रज्ञ सफल ठरले आहेत.
- ९.०० AM - नागपुरातील नरखेड पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
- ८.१५ AM - कश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर आता कश्मीरच्या शैक्षणिक विश्वात महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांनी योगदान द्यावे, या उद्देशाने पुण्यातील सरहद या कश्मीरसाठी काम करणाऱ्या संस्थेने आवाहन केले होते. या आवाहनानंतर महाराष्ट्रातील ७ शैक्षणिक संस्था कश्मीरमध्ये आपले महाविद्यालय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत.
- ८.०० AM - दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींची आज ७५ वी जयंती आहे. त्यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ ला झाला. आज सकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंजप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांनी राजीव गांधींच्या समाधीस्थळी त्यांना आदरांजली वाहिली.
आज..आत्ता..पूरग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विधानसभा निवडणूक पुढे ढकलाव्यात - राजू शेट्टी - aaj atta
झरझर नजर...आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
'चांद्रयान २' यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत, इस्त्रोची माहिती
Last Updated : Aug 20, 2019, 7:26 PM IST