-
10.20 PM - ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप
-
09.45 PM कोणत्याही प्रकारचे बंद, आंदोलने करू नका - राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
-
7:20 उन्मेष जोशी ईडी कार्यालयातून निघाले .... आज झालेल्या चौकशीला मी सहकार्य केले, चौकशीसाठी मला पुन्हा बोलावणार आहेत - उन्मेष जोशी
-
7:10 ठाणे - मनसेने ठाणे बंदची हाक घेतली मागे ..
-
6:48 अमरावती - कुरळपूर्णा येथील पुलाखाली नदीपात्रात दोघे जण बुडाले.
-
6:34 जालना - भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष दानवे यांची निवड... संतोष दानवे खासदार रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आहेत.
-
6:24 रायगड - श्रीवर्धन मतदारसंघात काँग्रेस करणार बंड.... श्रीवर्धन मतदारसंघ काँग्रेसला सोडा अन्यथा अपक्ष उमेदवार देणार... काँग्रेस मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा निर्धार...तटकरेंच्या अडचणी वाढणार
-
6:15 सांगली - पूरग्रस्त सानुग्रह अनुदान वाटपाचे निकष बदलले... अपार्टमेंट मधील वरच्या मजल्यावर देण्यात येणारे अनुदान वाटप करण्यात आले बंद.... काल पर्यंत सरसकट पूरग्रस्तांना देण्यात आले आहे 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान.... शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतोय संताप.... शहरातील गवळी गल्ली येथे संतप्त नागरिकांनी अनुदान वाटप पाडले बंद... .
आज..आत्ता.. ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप - todays important news
झरझर नजर...दिवसभरातील संपूर्ण घडामोडी वाचा एका क्लिकवर...
5:57 पुणे भाजप शहराध्यक्ष पदी आमदार माधुरी मिसाळ यांची वर्णी, विद्यमान शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या जागी आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे पुणे भाजपची धुरा, पुणे भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला संधी
5:14 - सरकारचे डोकं फिरले आहे का? कर्जमाफीच्या विषयावरून एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कर्जमाफीच्या विषयावरून भाजप सरकारला पुन्हा एकदा लक्ष करत घरचा आहेर दिला आहे. शेतकरी कर्जमाफीचे व्याज जिल्हा बँकेने भरावे, अशा सूचना एका परिपत्रकाद्वारे केल्याने खडसेंनी सरकारच्या निर्णयावर चांगलीच आगपाखड केली. 'सरकारचे डोकं फिरले आहे का? बँका व्याज कशा भरतील? सरकारने बँकांना मदत करायची सोडून व्याजाचा भुर्दंड त्यांच्यावर टाकला आहे. बँका हा भुर्दंड कसा सहन करतील? सरकारच्या अशा धोरणामुळे बँका अजून खड्ड्यात जातील', अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
4:58 जालना मतदान केंद्रावर 90 टक्के मतदान.... जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी केले मतदान
5:01 मुंबई - मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या सकाळी 11 वाजता राजगडवर बैठक...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बजावलेल्या नोटीसीमुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष.... या बैठकीत सरकार विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार का? याबाबत होणार उद्या निर्णय
4:27 सांगली - महापुराने कोल्हापूर विभागात शेतीचे अंदाजित 2800 कोटींचे नुकसान... शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्यासाठी उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतमध्ये निर्णय घेतला जाईल.... केंद्राकडे 2800 कोटींचा मागणी करणार... महापूर आणि दुष्काळ अशी राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती आहे....... त्यामुळे पिकांचे उत्पन्न कमी होणार.... कोल्हापूर विभागात पीक कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय घेणार.... सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, सर्वोत्तपरी मदत शेतकऱ्यांना केली जाईल - कृषी मंत्री अनिल बोंडे
4:35 - नाशिक
- 3 लाखाची लाच प्रकरण
- APMC सभापती शिवाजी चुंबळे यांचा जामीन अर्ज मंजूर
- चुंबळे यांना दिलासा
- 50 हजाराच्या जातमुचलक्यावर मंजूर
- दर बुधवार आणी गुरुवार 11 ते 2 ACB कार्यालयात हजेरीची अट
- 2 महिन्यांसाठी आहे ही अट
4:38 गोंदिया - विना अनुदानित शिक्षकांनी आज जिल्हा परिषद समोर विविध मागण्यांसाठी अर्धनग्न होऊन केल आंदोलन
पूरग्रस्त भागात १ हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी - मुख्यमंत्री