महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज आत्ता..:  शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध; आरेबद्दलची भूमिकाही जाहीर

झरझर नजर.. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

आज आत्ता

By

Published : Oct 12, 2019, 10:50 AM IST

Updated : Oct 12, 2019, 1:12 PM IST

  • 12:48 PM : लातूर: नितीन गडकरी : बिदर - लातूर राष्ट्रीय महामार्ग घोषित करून काम पूर्ण करणार...शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही...शेतीमालाला किंमत नाही... त्यामुळे पूरक व्यवसाय वाढवायला पाहिजेत..लहान उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे...परिस्थिती कठीण पण बदलायला पाहिजे...
  • 12:41 PM : लातूर-संभाजी पाटील निलंगेकर: जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन काम केले....कार्यकर्त्यांच्या जीवावर काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपमय केला... सालगडी म्हणून जिल्ह्यात काम केले.... गेल्या वर्षातील काम पाहून माझा पगार वाढवा आणि सालगडी म्हणून ठेवा...
  • 12:10 PM : वाशिम- समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातून जात आहे..त्यामुळे येत्या काळात रोजगार उपलब्ध होणार आहे..- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • 12:10 PM : वाशिम- पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी वाशिम जिल्ह्याला आकांक्षी घोषित केले..त्यामुळे एक हजार कोटी रुपयांची काम होणार आहे..
  • 12:10 PM : वाशिम-15 वर्षात काँग्रेस ने 20 हजार कोटी दिले..आम्ही पाच वर्षात 50 हजार कोटी रुपये दिले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • 12:10 PM : वाशिम-काँगेस राष्ट्रवादीच्या जाहीर नाम्यावर मुख्यमंत्री यांची जोरदार टीका..
  • 11:53 AM : वाशिम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात..वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार लखन मलिक यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाषणाला सुरुवात.
  • 11:37 AM : वाशिम- भाजप महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार लखन मलिक यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभा मंडपात आगमन..
  • 11:27 AM : मुंबई- पीएमसी बँकेच्या खातेदारांबरोबरची राज ठाकरे यांची बैठक संपली...मी सभेत याबद्दल बोलतो आणि याबद्दल काय करता येईल हेही पाहतो, असे आश्वासन राज ठाकरेंनी खातेदारांना दिले..जवळपास अर्धा तास बैठक चालली..30 हून अधिक खातेदारांनी घेतली होती राज ठाकरेंची भेट..राज ठाकरे आजच्या सभेत पीएमसी बँकेच्या घोटाळ्यावर बोलू शकतील...
  • 11:26 AM : मुंबई- पीएमसी व सीटी बँकेच्या खातेदारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट....
  • 11:15 AM : सांगली- मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा (२०१९) विष्णूदास भावे गौरव पदक पुरस्कार 'जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हटगडी यांना जाहीर'..
    5 नोव्हेंबर रोजी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी याच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण.. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समितीतर्फे प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते...
  • 10:16 AM : मुंबई- आरेचा उल्लेख रिजनल मेनोफेस्ट मध्ये आहे..आरे बद्दलची भूमिका सेनेने मांडली आहे.. आमचा विरोध आहेच, सर्व पक्षांच्या नेत्यांना उभं करा मग चरचा करू - शिवसेना
  • 10:16 AM : मुंबई- सरकार आल्यास वचन नाम्यातील सगळे वचन पूर्ण करणार - शिवसेना
  • 10:16 AM : मुंबई- वचननाम्यावर मुख्यमंत्री आणि आम्ही बसून बोललो नाही. पण फोन वर चर्चा झाली तेव्हा आम्ही सारखे बरोबर आहोत.
Last Updated : Oct 12, 2019, 1:12 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details