2.51 PM - औरंगाबाद - जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1518.450 (462.824 मी) फुटांवर पोहोचली आहे. पाण्याची एकूण आवक 63065 क्युसेक तर, धरणातील एकूण पाणी साठा 2510.505 दलघमी आहे. यापैकी जिवंत साठा 1772.399 दलघमी आहे. सध्या धरण 81.64 टक्के भरले आहे. उजव्या बाजूच्या कालव्यातून 800 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.
2:46 PM -नाशिक - बकरी ईद कुर्बानीसाठी लाखो रूपयाचे बोकड बाजारात.
2:35 PM -ठाणे - पूरग्रस्तांना मेडिकल असोसिएशनच्यावतीने डोंबिवलीतून 15 लाखांची औषधे रवाना
2:25 PM -गोंदिया - सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरल्याने कावड घेऊन जाणाऱ्या युवक वाघ नदीत बुडाला, शोधमोहीम सुरू
2:10 PM -मुंबई - पूरस्थितीत निवडणूक आठवते कशी उध्दव यांचा राज ठाकरेंना टोला
1:42 PM -मुंबई - महापुराच्या संकटाला शिवसेना सज्ज. आज शिवसहाय मदत रवाना झाली - उद्धव ठाकरे
1:09 PM -औरंगाबाद - जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1518.390 (462.806 मी) फुटांवर पोहोचली आहे. पाण्याची एकूण आवक 62966 क्युसेक तर, धरणातील एकूण पाणी साठा 2504.178 दलघमी आहे. यापैकी जिवंत साठा 1766.072 दलघमी आहे. सध्या धरण 81.35 टक्के भरले आहे. उजव्या बाजूच्या कालव्यातून 800 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.
1:06 PM -मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकने दिवा या ठिकाणी क्रॉसिंग करणाऱ्या एका युवकाला उडवले. ही घटना दुपारी घडली असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
12.54 - कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय - पुराच्या परिस्थितीचा गैरफायदा गेत जीवनावश्यक वस्तू अव्वाच्या सव्वा दराने तसेच, चढ्या किमतीने विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा बाबींविषयी कारवाई करण्यासाठी 1077 आणि 2655416 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
12:53 PM -कोल्हापूर - उद्या सकाळी 9 वाजता मुस्लिम बोर्डिंग दसरा चौक येथे बकरी ईदची नमाज होणार आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून अन्य मस्जिद आणि ईदगाह मैदानावर सुद्धा नमाज होणार आहे. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी सामूहिक दुआ होईल.
यंदाच्या बकरी ईदच्या उत्साहावर महापुराचे सावट असल्याने बकऱ्याची कुर्बानी रद्द करून सामूहिक वाटा पद्धतीने हा विधी केला जाणार आहे.अन्य खर्चाला फाटा देऊन ही रक्कम पूरग्रस्तांच्या मदत निधीत जमा करण्याचे ठरविले आहे.
12:22 PM -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे माँ साहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शिवसहायय सामग्री घेऊन जाणाऱ्या वाहनांना नारळ फोडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी गाड्या सोडल्या.
12:01 PM -मुंबईतील प्रसिद्ध चिंतामणी गणपती आगमनाला सोहळ्याला सुरुवात. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर व सांगली पूर भागात चिंतामणी मंडळाने 5 लाखाची मदत केली आहे. तसेच आगमनाला येणाऱ्या सर्व भक्तांना मदत करण्याचे आव्हान केले आहे. जमा झालेला मदत निधी ते मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहेत.
यावर्षी 100 वर्ष चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीला झाले आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे मोठी गर्दी गणपती अगमनाला होताना दिसत आहे
10.39 AM -पेण-खोपोली मार्गावर झालेल्या अपघातात 2 ठार 20 जखमी. टँकरने एसटी बसला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या मार्गावर सध्या अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. रघुनाथ बाळाराम म्हात्रे (रा. बोरी, वय 50) आणि दिनेश खेडेकर (रा. नानेगाव, वय 22) अशी मृतांची नावे आहेत.
10.00 AM - नागपूर - महिला चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा, नागपूरच्या फ्रेंड्स शोरूममधील धक्कादायक प्रकार
9:47 AM -गेल्या 24 तासांत सांगलीतला पूर 3 इंचांनी आणि कोल्हापुरातील पूर 9 इंचांनी उतरलाय. स्थलांतरितांचा आकडा 4 लाख 13 हजार 945 आहे. सांगलीतून 1 लाख 43 हजार 641 आणि कोल्हापुरातून 2 लाख 33 हजार 150 लोकांना घरे सोडावी लागली आहेत.
9.45 AM -कोल्हापूर - पुरात बुडालेल्या घरातील ८० तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; कोल्हापुरमधील कसबा बावड्यातील घटना
9.30 AM - चंद्रपूर - महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब; ईको-प्रो संस्थेस 'राष्ट्रीय युवा पुरस्कार' जाहीर
9:23 AM -औरंगाबाद - जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1518.210 (462.750 मी) फुटांवर पोहोचली आहे. पाण्याची एकूण आवक 63316 क्युसेक तर, धरणातील एकूण पाणी साठा 2485.151 दलघमी आहे. यापैकी जिवंत साठा 1747.045 दलघमी आहे. सध्या धरण 80.47 टक्के भरले आहे. उजव्या बाजूच्या कालव्यातून 600 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.
8.44 AM- मुंबई- (रविवारचा कल्याण-ठाणे अप जलद मार्गावरील (स. 11.20 वाजल्यापासून दु. 3.50 वाजेपर्यंत) नियोजित मेगा ब्लॉक तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे.
08.05 AM - सांगली- कृष्णा नदीची पाणी पातळी 54'6" फुटांवर. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरूच. शहराच्या मुख्य रस्त्यावरील पाणी काही प्रमाणात ओसरतंय.
7.21 AM -पुणे : १० ऑगस्टपासून एनडीआरएफ, एसडीआरएफ, प्रादेशिक लष्कर, नौदल आणि बिगर सामाजिक संस्था आणि जिल्हा प्रशासनाकडून अनेक पथके आणि बोटी बचावकार्य करत आहेत.
6.48 AM -कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या माल वाहतूक डब्यांच्या गाडीचा एक डबा मध्यरात्री 2-3 च्या सुमारास रुळांवरून उतरला आहे. यामध्ये मिलिटरीच्या गाड्या आहेत. ठाणे आणि कळव्याच्या मध्ये हा माल डबा आहे. जलद गतीच्या मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर सुरू आहेत.