महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज..आत्ता.. गोंदियात ट्रॅक्टर नाल्यात उलटला; चाकाखाली दबून चौघांचा मृत्यू - शिवेंद्रराजे भोसले

झरझर नजर.. दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

झरझर नजर

By

Published : Jul 28, 2019, 12:20 PM IST

Updated : Jul 28, 2019, 3:20 PM IST

कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी १३ बंडखोर आमदारांना ठरवले अपात्र

बंगळुरु- कर्नाटक विधानसभा अध्यक्ष के. आर रमेशकुमार यांनी काँग्रेस- जेडीएसच्या १३ बंडखोर आमदांराना आज (रविवार) अपात्र ठरवले. आत्तापर्यंत एकून १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

गोंदियात ट्रॅक्टर नाल्यात उलटला; चाकाखाली दबून चौघांचा मृत्यू

गोंदिया - ट्रॅक्टर नाल्यात उलटल्याने ट्रॅक्टरखाली दबून चौघा मजूरांचा मृत्यू झाला असून इतर मजूर किरकोळ जखमी झाले आहे. नाल्यात पडलेला ट्रॅक्टर अंगावर पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एका मजूराचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अधिक वाचा

चित्रा वाघ मला सांगून गेल्या, पतीच्या संस्थांवर कारवाईचा होता दबाव - शरद पवार

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पदाचा राजीनामा दिला. याविषयीही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. चित्रा वाघ या मला सांगून गेल्याचे पवार म्हणाले.अधिक वाचा

विधानसभेसाठी २४० जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत - शरद पवार

पुणे -राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २४० जागांवर एकमत झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच उर्वरित ४८ जागांसाठी मित्रपक्षांशी चर्चा सुरु असल्याचेही पवार म्हणाले. अद्यापही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित आघाडीशी बोलणी झाली नसल्याचे पवार म्हणाले. सविस्तर वृत्त

आमदार शिवेंद्रराजे भोसले, संग्राम जगताप कुठेही जाणार नाहीत - शरद पवार

पुणे - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून भाजप-सेनेते जाणाऱ्यांची नावे समोर येऊ लागल्यानंतर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि संग्राम जगतापही पक्षाला राम-राम करणार, अशी चर्चाही होती. मात्र, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले, संग्राम जगताप, राहुल जगताप कुठेही जाणार नाहीत, ते पक्षातच राहणार असल्याचा खुलासा केला आहे. सविस्तर वृत्त

आमदार फोडाफोडीसाठी स्वत: मुख्यमंत्रीच करतात फोन, शरद पवारांचा आरोप

पुणे - सत्तेचा गैरवापर करुन भाजप लोकप्रतिनिधी फोडण्याचे काम करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आपल्या संस्था टिकवण्यासाठी अनेक नेत्यांवर भाजप दबाव आणत असून, पक्षांतर करण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. स्वत: राज्याचे मुख्यमंत्रीच पक्षांतरासाठी लोकप्रतिनीधींना फोन करत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. सत्तेचा एवढा गैरवापर झालेला कधी बघितला नाही. भाजपचा हा प्रकार लोकशाहीस घातक असल्याचे पवार म्हणाले. अधिक वाचा

Last Updated : Jul 28, 2019, 3:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details