महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

LIVE BLOG आज आत्ता... जम्मू-काश्मीरला भूकंपाचा धक्का; ३.६ रिश्टर स्केलवर नोंद

झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या वाचा एकाच ठिकाणी..

झरझर नजर

By

Published : Jul 14, 2019, 7:49 AM IST

Updated : Jul 14, 2019, 11:00 PM IST

----------

दुपारी 2.47 - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार सामना

दुपारी 12.18 -नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा.. ट्विटरवर राहुल गांधींना राजीनामा लिहून पाठवलेल्या पत्राचा फोटो शेअर केला.. राजीनामा पत्रावर १० जून तारीख दिसत आहे.

सकाळी 10.20 - मुंबई - पीक विमा कंपन्याविरुद्धचा मोर्चा म्हणजे शिवसेनेची निव्वळ नौटंकी; विजय वडेट्टीवार

सकाळी 9.40 वाशिम - मेडशी येथील अज्ञात चोरट्याने फोडली डिसीसी बँक; शनिवारी मध्यरात्रीची घटना.

सकाळी 9.25 अमरावती - पथ्रोट गावात शिरलेल्या हरणाचा दुर्दैवी मृत्यू, पाण्याच्या शोधात गावात शिरल्याचा अंदाज

सकाळी 9.15 पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल एक क्विंटल गांजा जप्त, भोसरी पोलिसांची कारवाई

सकाळी 9.10 अहमदनगर - निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी केंव्हा..श्रध्दाच्या आईचा सरकारला सवाल., शनिवारी घटनेला ३ वर्ष पूर्ण

सकाळी 8.55 - औरंगाबादमध्ये आणखी एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न

औरंगाबाद - शहरात आणखी एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील पडेगाव परिसरात असलेले एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम कापून रक्कम चोरण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने चोरट्यांना एटीएम तोडता न आल्याने रक्कम सुरक्षित राहिली. याप्रकारामुळे औरंगाबाद शहरातील एटीएमची सुरक्षा धोक्यात आली आहे. औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी घडली एटीएम लुटीची घटना अधिक वाचा

सकाळी 8.50 आसाममध्ये पूर : काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील बहुतांश प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवले

बाक्सा - आसाममध्ये भयंकर पूरस्थिती आहे. याचा फटका माणसांसह प्राण्यांनाही बसत आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील ७० टक्के प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यातील ९५ कॅम्पस पाण्याखाली गेले आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्यान प्रशासनातील बहुतेक वन अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अधिक वाचा

सकाळी 8.00 उस्मानाबाद - झाड पाल्यातून विषबाधा झाल्याने सुमारे ७८ मेंढ्यांचा मृत्यू; तेर जवळील हिंगळजवाडीतील घटना

सकाळी 7.45 कणकवली - कलमठ ते खारेपाटण या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या केसीसी बिल्डकाँनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी तक्रार दाखल.

सकाळी 7.30 पुणे - मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी हिंजवडी पोलिसांनी केली जेरबंद; २ लाखांचे २२ मोबाईल जप्त

सकाळी 7.15 अमरावती - दर्यापूर तालुक्यातील पुर्णा नदीवरील धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

सकाळी 7.12 - सांगली : कृष्णेच्या पात्रातील मगरीचा मृत्यू, 12 फुटी अजस्त्र मगर सापडली मृतावस्थेत,मृत मासे खाल्याने मृत्यू झाल्याची माहिती

Last Updated : Jul 14, 2019, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details